मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी अनेकदा सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या सुविधांचा आपण वापर करतो. पण केंद्र सरकारने यासंबंधी सावधानतेचा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना विमानतळं, कॅफे, हॉटेल आणि बसस्थानकं अशा सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पोर्टलला मोबाईल चार्ज करताना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. याचं कारण सध्या युसबी चार्जर घोटाळा (USB Charger Scam) सुरु आहे. हा घोटाळा नेमका काय आहे? आणि सावधगिरी कशी बाळगायची? हे समजून घ्या.
सायबर गुन्हेगार अनेकदा विमानतळं, कॅफे, हॉटेल आणि बसस्थानकं अशा ठिकाणी लावण्यात आलेल्या चार्जिंग पोर्टलशी छेडछाड करतात. याच्या माध्यमातून संबंधित लोकांना जाळ्यात ओढत त्यांना गंडवण्याचा हेतू असतो.
जर चार्जिंग पोर्टल स्टेशनवरील युएसबीशी सायबर गुन्हेगारांनी छेडछाड केली असेल तर ते ज्यूस जॅकिंग सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतात. ज्यूस जॅकिंग हा एक सायबर हल्ल्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये सायबर गुन्हेगार युजर्सचा डेटा चोरण्यासाठी सार्वजनिक युएसबी चार्जिंग स्टेशनचा वापर करतात किंवा त्यांच्याशी कनेक्ट केलेल्या डिव्हाईसमध्ये घुसखोरी करतात.
युजर्स जेव्हा आपलं डिव्हाइस अशा तडजोड केलेल्या चार्जिंग पोर्टशी कनेक्ट करतात तेव्हा तेव्हा, सायबर गुन्हेगार डेटा चोरु शकतात. तसंच तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस टाकू शकतात. ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. तसंच त्याच्यात व्हायरसची घुसखोरी करु शकतात. याशिवाय तुमच्या मोबाईलचा वापर करत इतरांकडे खंडणीची मागणी केली जाऊ शकते.
Safety tip of the day: Beware of USB charger scam.#indiancert #cyberswachhtakendra #staysafeonline #cybersecurity #besafe #staysafe #mygov #Meity #onlinefraud #cybercrime #scam #cyberalert #CSK #cybersecurityawareness pic.twitter.com/FBIgqGiEnU
— CERT-In (@IndianCERT) March 27, 2024
- सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताना आपलाच चार्जर वापरा. किंवा आपली केबल, पॉवर बँक सोबत ठेवा. तसंच भितींवरील सॉकेटचाच वापर करा.
- आपलं डिव्हाइस सुरक्षित किंवा लॉक ठेवा. अज्ञात डिव्हाइसशी कनेक्ट करणं टाळा.
- आपला मोबाईल चार्ज होताना तो शक्य झाल्यास स्विच ऑफ ठेवा.
- जर तुम्ही सायबर गुन्ह्याला बळी पडलात तर www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर किंवा 1930 क्रमांकावर तक्रार नोंदवा.