मुंबई : Vodafone Idea 5G Price Plans Launch Date: गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की भारतात लवकरच 5G सेवा सुरु केली जाणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने 5G सेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, 5Gची सेवा कधी सुरु होईल, याबाबत व्होडाफोन आयडियाकडून कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. Vodafone Idea 5G सेवा कधी सुरु करेल (Vi 5G Launch Date), कोणत्या शहरांमध्ये (Vi 5G Cities) ही सेवा प्रथम सुरु होईल आणि त्याची किंमत किती असेल (Vi 5G Price) याबाबत अधिक जाणून घ्या.
एअरटेलने दावा केला आहे की, ते ऑगस्ट 2022 मध्येच त्यांच्या यूजर्ससाठी 5G सेवा सुरु करतील, तर Jio ने देखील संकेत दिले आहेत की, ते या महिन्यात किंवा सप्टेंबरमध्ये 5G सेवा सुरु करतील. व्होडाफोन आयडियाने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे की Vi ऑक्टोबर 2022 पर्यंत भारतात 5G सुरु करु शकते.
व्होडाफोन आयडिया जेव्हा 5G सेवा सुरु करेल, तेव्हा कोणत्या शहरांना याचा मान मिळणार याची उत्सुकता आहे. लॉन्चच्या तारखेप्रमाणे, याबद्दलही कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु महाराष्ट्रात पुणे, गुजरातमधील गांधीनगर आणि बंगलोर येथे 5G सेवा आणणारी Vi ही पहिली कंपनी असू शकते. कारण येथे 5G चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत.
आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, नॉर्थ ईस्ट आणि ओडिशा या सर्कलसाठी Vi ने 5G स्पेक्ट्रम घेतलेला नाही. त्यामुळे येथे ही सेवा सुरु होणार नाही. Vi च्या 5G सेवा काही ठिकाणी उपलब्ध होणार नाहीत आणि 5G सेवा वापरण्यासाठी Vi यूजर्सला Jio किंवा Airtel कडे पोर्ट करावे लागेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की Vi 5G प्लानची किंमत 4G पेक्षा खूप जास्त असू शकते. परंतु अधिकृतपणे याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.