'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'व्होडाफोन'ची फ्री कॉलिंगची नवी ऑफर

ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल

Updated: Aug 25, 2018, 02:40 PM IST
'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'व्होडाफोन'ची फ्री कॉलिंगची नवी ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओनं बाजारात दाखल घातलेला धुमाकूळ अद्यापही इतर कंपन्यांसाठी भारी पडतोय. यातूनच सावरण्यासाठी आता पुन्हा एकदा व्होडाफोननं आपल्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर सादर केलीय. व्होडाफोननं ग्राहकांसाठी १५९ रुपयांचा नवा प्रिपेड रिचार्ज पॅक लॉन्च केलाय. या पॅकमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत २८ जीबी डाटा मिळणार आहे. 

हा पॅक २८ दिवसांसाठी वैध राहील. म्हणजेच ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल. 

भारताच्या सर्व सर्कल्समध्ये हा प्लान लागू असेल. या प्लानद्वारे कंपनी एअरटेल आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लान्सला टक्कर देऊ शकते.