जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान

रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.

Updated: Jul 31, 2017, 06:10 PM IST
जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान title=

नवी दिल्ली : रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कं‍पन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.

विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वोडाफोनने ८४ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉल आणि रोज 1GB, 4G/3G डेटा देणारा प्लान आणत आहे. 352 रुपयांचा हा प्लान असणार आहे.

सध्या दिल्लीमध्ये हा प्लान लॉन्च करण्यात आला आहे. वोडाफोनच्या या नव्या सिमसाठी सुरुवातीला ४४५ रुपये मोजावे लागणार आहे. यानंतर ८४ दिवस विद्यार्थ्यांसाठी अनलिमिटेड वॉईस कॉल आणि रोज एक जीबी 4G/3G डेटा, ऑफर कुपन आणि मॅसेंजर बॅग फ्री मिळणार आहे.

त्यानंतर ३५२ रुपयांमध्ये हा प्लान तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सुरुवातीला सर्वायवल किटसाठी तुम्हाला ४४५ रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामध्ये काही ऑफर कुपन देखील असणार आहेत.

याआधी वोडाफोनने २२४ रुपयांचा प्लॅन आणला होता. ज्याची वॅलिडिटी ७० दिवस होती. या प्लानमध्ये यूजरला रोज १ दिवस १ जीबी डेटा मिळतो आणि फ्री कॉलिंग सर्विस देखील मिळते.