मुंबई : भारतात ऑनलाईन विक्रीतील दुसरी सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये मालकी हक्क मिळण्यासाठी अमेरिकेतली सर्वात मोठी रिेटेल चेन वॉलमार्ट सज्ज झालीय. येत्या दोन आठवड्यात वॉलमार्ट फ्लिपकार्टमधील 86% समभाग खरेदी करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फिल्पकार्टच्या सर्व गुंतवणूकदारांनी वॉलमार्टच्या खरेदी प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अॅमेझोन आणि वॉलमार्ट या दोन्ही कंपन्यांची जगभरात एकमेकांशी स्पर्धा आहेच. त्याचीच परिणिती आता भारतातही होतेय.
सचिन आणि बेन्नी बन्सल यांनी साधारण दशकभरापूर्वी भारतात ऑनलाईन विक्रीसाठी फ्लिपकार्ट ही कंपनी स्थापन केली. गेल्या पाच ते सहा वर्षात फ्लिपकार्टनं व्यवसायाची नवनवी शिखरं पादाक्रांत केली. भारतातील सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी ठरलेल्या फ्लिपकार्टला आता अमेरिकन मालक मिळणार आहे.