आपल्या चेहऱ्याच सौंदर्य दातांमुळे अधिक खुलतं. यात दाताचा आकार खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही पाहिलं असेल अनेक लोकांच्या दातात अंतर म्हणजेच दातांमध्ये गॅप पाहिला मिळतो. दातांमध्ये अंतर असण्याला वैद्यकिय भाषेत डायस्टेमा असं म्हटलं जातं. दातांमध्ये अंतर असल्यामागे कारण म्हणजे वरच्या ओठांच्या बांधणीमुळे पुढच्या दातांमध्ये मोठे अंतर येऊ शकतात. आनुवंशिकतामुळे दातांमध्ये अंतर असतात. जेव्हा गिळताना जीभ दातांवर दाबते तेव्हा पुढच्या दातांमध्ये अंतर येतो. त्याशिवाय दातांच्या सवयीमुळेही दातांमध्ये अंतर येतं असं तज्ज्ञ सांगतात.
पण शास्त्रानुसार दातांमधील अंतर हे लोकांचा स्वभावदेखील सांगतो. भविष्यात ते काय साध्य करतात याचा अंदाज त्यांच्या दातांमधील अंतरावरून लावला जाऊ शकतो. दातांमधील गॅप ही लोकांना शुभ असते किंवा अशुभ हे आपण जाणून घेणार आहोत.
समुद्र शास्त्रानुसार, दातांमध्ये अंतर असलेले लोक केवळ ज्ञानी नसतात तर त्यांच्यात अद्भुत प्रतिभाही असते. त्यांना आयुष्यात खूप यश मिळवतात.
दातांमध्ये गॅप असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व साधे असून हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होतो.
ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर असते ते मनमोकळे असतात आणि त्यांच्या मनात कोणाचाही द्वेष नसतो. या लोकांना कामाबद्दल बोलायला आवडतं. असे लोक विनाकारण कधीच बोलत नाहीत.
जे लोक काम करतात आणि त्यांच्या दातांमध्ये अंतर असते, असे लोक करिअरच्या क्षेत्रात मोठे यश मिळवणार असल्याचे सूचित करतात.
हे लोक सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असतात आणि प्रत्येक काम मोठ्या उत्साहाने करतात. हे लोक खूप भाग्यवान मानले जातात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)