एकही रुपया खर्च न करता, अगदी Free मध्ये पाहा IPL 2022 Playoffs, कसं ते जाणून घ्या

 जर तुम्ही देखील IPL (IPL 2022) चे चाहते असाल आणि काही दिवसांत सुरू होणारा प्लेऑफचा एकही सामना तुम्हाला मिस करायचा नाहीय तर...

Updated: May 15, 2022, 04:08 PM IST
एकही रुपया खर्च न करता, अगदी Free मध्ये पाहा IPL 2022 Playoffs, कसं ते जाणून घ्या title=

मुंबई : जर तुम्ही देखील IPL (IPL 2022) चे चाहते असाल आणि येत्या काही दिवसांत सुरू होणारा प्लेऑफचा एकही सामना तुम्ही गमावू इच्छित नसाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक पर्याय आहे. Disney + Hotstar वर उपलब्ध असलेले हे क्रिकेट सामने पाहण्यासाठी, तुम्हाला एका OTT प्लॅटफॉर्मच्या सदस्यत्वाबद्दल पैसे द्यावे लागणार नाहीत. हा पर्याय कोणता आणि काय आहे हे जाणून घ्या

खरंतर खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलच्या अशाच काही प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे.

Airtel Xstream Fiber च्या Rs 699 च्या प्लॅनमध्ये तुम्हाला 40Mbps स्पीडवर इंटरनेटसह, इतर अनेक आश्चर्यकारक फायदे दिले जातात. या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar सबस्क्रिप्शन आणि Airtel Thanks चे अनेक फायदे देखील दिले जात आहेत.

एअरटेलच्या रु. 1099 च्या प्लॅनमध्ये 200Mbps च्या इंटरनेट स्पीडसह, तुम्हाला Disney + Hotstar चे टीव्ही सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये Airtel Thanks चे फायदे देखील समाविष्ट आहेत.

एअरटेलच्या 1,498 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps स्पीडवर इंटरनेट मिळते आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह, Airtel Thanks चे फायदेही त्यात दिले जात आहेत.

Airtel Xstream Fiber च्या या प्लॅनची ​​किंमत 1,599 रुपये आहे आणि यामध्ये तुम्हाला Disney + Hotstar च्या टीव्ही फायद्यांसह Airtel Thanks चे फायदे दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये 300Mbps च्या स्पीडने इंटरनेट सुविधा मिळते.

यादीतील सर्वात महागडा प्लॅन, एअरटेल तुम्हाला 3,999 रुपयांमध्ये 1Gbps स्पीडने इंटरनेट देते. तसेच, हा प्लॅन डिस्ने+हॉटस्टार सबस्क्रिप्शन आणि एअरटेल थँक्स फायद्यांसह देखील येतो.