UPI Lite X Feature: युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूपच लोकप्रिय आहे. डिजीटल पेमेंटमुळं व्यवहार करणे सोप्प झालंय. मात्र कधी कधी इंटरनेटची सुविधा नसल्याने युपीआय पेमेंटमध्ये करण्यास अडचण येते. नागरिकांची हिच अडचण समजून घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने एक नवीन Upi Lite X Feature लाँच केलं आहे. या फिचर्समुळं युजर्सना ऑफलाइन मनी ट्रान्सफरची सुविधा देते.
शहराच्या बाहेर गेल्यास किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यास ऑनलाइन पेमेंट करणे कठिण होऊन जाते. अशावेळी जवळ कॅश नसेल तर खूप अडचणी निर्माण होतात. मनात असतानाही वस्तू खरेदी करता येत नाही. हीच अडचण दूर करण्यासाठी युपीआय लाइट एक्स लाँच करण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटी नसतानाही पैशांची देवाण-घेवाण करता येते. ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे अशा ठिकाणांसाठी हे खूप फायदेशीर ठरु शकता. अनेकदा फोनमध्ये रिचार्ज नसल्यासही पेमेंट होण्यास प्रोब्लेम येतो. UPI LITE X नियर फील्ड कम्युनिकेशन (एनएफसी) सपोर्टने काम करतं. UPI LITE पेमेंट इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत जास्त फास्ट आहे.
युपीआय लाइट एक पेमेंट सोल्युशन आहे ज्यात छोट्या-मोठ्या देवाणघेवाणीसाठी वापर होऊ शकतो. यात एनपीसीआय कॉमन लायब्रेरी (सीएल) अॅपचा उपयोग करण्यात आला आहे. यात 500 रुपयांपेक्षा कमी पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा एका ऑन डिव्हाइस वॉलेटसारखी आहे. यात युजर्सना युपीआय पिनचा उपयोग करुन पेमेंट करण्याची सुविधा देते.
UPI किंवा UPI Lite वापरून व्यवहार सुलभ करते. युजर्सचा UPI आयडी किंवा लिंक केलेला फोन नंबर वापरून QR कोड स्कॅन करून हे व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात. मात्र, UPI Lite Xवरुन पेमेंट करत असताना दोघांकडेही युपीआय लाइट एक्स असणं गरजेचं आहे. UPI व्यवहारादरम्यान, पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातात. पैसे UPI Lite वरून ऑन-डिव्हाइस वॉलेट किंवा UPI Lite खात्यावर पाठवले जातात.
युपीआय बँक अकाउंटहून एकादिवसात जास्तीत जास्त 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जातात. तर, युपीआय लाइटवरुन जास्तीत जास्त 500 रुपयेच ट्रान्सफर करता येतात. तर, एका दिवसात 4 हजारांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात.