तुम्हाला आलाय का 5G साठी कॉल, मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

5G SIM साठी तुम्हाला कॉल आला तर काय करायचं? जाणून घ्या

Updated: Aug 5, 2022, 01:56 PM IST
तुम्हाला आलाय का 5G साठी कॉल, मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची title=

मुंबई : आपण सगळेच जण 4G वापरत आहोत पण लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. एअरटेल आणि Jio कंपनीने 5G सेवा घेतली असून आता लवकरच ती ग्राहकांना वापरण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. तुमचं SIM कार्ड 5G ला सपोर्ट करणं आहे का? जर तुम्हाला 5G SIM साठी कॉल आला असेल किंवा भविष्यात येऊ शकतो त्यासाठी ही बातमी तुम्ही वाचण अत्यंत महत्त्वाचं आहे. 

असे फोन आल्यानंतर नेमकं करायचं काय? आता तुम्ही असे फोन घेऊन जर तुमची माहिती सगळी त्यांच्यापर्यंत पोहोचवलीत तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. कारण ते फोनकॉल कंपनीकडून आले आहेत की फेक आहेत हे जाणून घेऊया. 

अजूनतरी कंपनीने 5G सिमकार्ड काढलं नाही. त्यामुळे तुम्हाला जर असा फोन आला तर तो हॅकर्सचा असण्याची शक्यता आहे. तर कंपनीकडून ग्राहकांना तुमचं असलेलं सिमकार्ड अपडेट करण्याचं आवाहन करत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन हॅकर्स लोकांना फोन करून त्यांची माहिती घेऊन लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे असे फोन आले तर तुमची कोणतीही माहिती त्यांना देऊ नका. 

हॅकर्स तुम्हाला बोलण्यात गुंतवून तुमच्याकडून तुमच्या घरचा पत्ता, तुमचे सगळे डिटेल्स जाणून घेतात आणि त्याचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. तुम्हालाही असा कोणताही कॉल आला तर तुमचा तपशील शेअर करू नका. 

अशा माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या कोणत्याही सेंटरला भेट देऊ शकता. तिथे तुम्हाला 5G सिमकार्ड आणि त्यासंबंधित इनकमिंग कॉल्सचीही माहिती मिळेल. जर तुमच्याकडे 4G LTE वर चालणारं सिमकार्ड असेल तर तुम्हाला 5G  सिमची गरज नाही. तुम्ही त्यावर 5G सेवा सुरू करू शकता. पण यासाठी जवळच्या तुमच्या सिमकार्डच्या कंपनीच्या सेंटरला भेट द्या. कोणत्याही कॉलला भुलू नका आणि आपली माहिती शेअर करू नका.