'तिला' कसं खुश करु? Google वर पुरुष काय शोधतात, वाचून बसेल धक्का

पुरुषांकडून गुगलवर शोधल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये .... 

Updated: Jul 5, 2022, 09:14 AM IST
'तिला' कसं खुश करु? Google वर पुरुष काय शोधतात, वाचून बसेल धक्का  title=
What Men Search the Most on Google

What Men Search the Most on Google:  प्रश्न कोणताही असो, त्या प्रश्नाचं उत्तर कोणालाही ठाऊक नसलं तरीही ते तुम्हाला मिळतंच. कारण एक असा अदृश्य मित्र आहे, ज्याच्याकडे लहानातल्या लहान प्रश्नापासून मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नाचंही उत्तर आहे. 

बरं प्रश्नाचं उत्तर नसलं तरी तो तुम्हाला काही उपयोगाचे सल्ले देण्याचंही काम करतो. आठवतोय का हा मित्र? कसा आठवेल, कारण तुम्ही याला विसरलातच कुठे.... 

हा मित्र आहे गुगल. गुगल हे सर्च इंजिन मागल्या बऱ्याच वर्षांमध्ये तुमचा आमचा मित्रच झाला आहे. अशाच या मित्राकडे तुम्ही कोणकोणते प्रश्न विचारले अर्थात गुगलवर तुम्ही काय काय सर्च केलं याचा उलगडा करणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. 

या अहवालामध्ये विविध वर्गांमध्ये युजर्सची विभागणी करण्यात आली आहे. यातलाच एक वर्ग म्हणजे तरुण किवा पुरुष. Google वर मुलं नेमकं काय सर्च करतात हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. 

पुरुषांकडून गुगलवर शोधल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये Sexuality संबंधित प्रश्नांची संख्या जास्त आहे. अहवालानुसार दरवर्षी साधारण 68 हजार पुरुष आपण नपुंसक आहोत का, हा प्रश्न सर्च करतात. 

दाढी वाढतेय की नाही, भरगच्च दाढी येण्यासाठी काय करावं, शेव्हिंग कसं करावं या गोष्टीसुद्धा तरुण, पुरुष सर्च करतात. 

टोपी वापरल्यामुळं केसांवर त्याचा काय परिणाम होतो, व्यायामाची योग्य पद्धत काय, शारीरिक सुदृढका कशी बाळगावी? असे प्रश्नही ही मंडळी गुगलला विचारतात. गेल्या काही दिवसांमध्ये कोणता प्रोटीन शेक प्यावा, हा प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

पुरुष सर्च करत असणाऱ्या विषयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) चाही समावेश आहे. महिलांप्रमाणेच पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होतो का, त्याचं स्वरुप काय असतं असे प्रश्नही पुरुष वर्गाकडून गुगलला विचारले जातात. 

मुलींबाबत काय सर्च करतात? 
मुलं गुगलवर मुलींसंदर्भात जाणू इच्छितात. मुलींचं मन कसं जिंकावं, त्यांना इम्प्रेस कसं करावं असे प्रश्न मुलं विचारतात. मुली आनंदात कशा राहतात, त्यांना काय नाही आवडत, लग्नानंतर मुली काय करतात असे अनपेक्षित प्रश्न मुलं गुगलला विचारतात.