तुमचं Whatsapp हॅक होण्याचा धोका! पाहा कसं टाळता येईल

Whatsapp युजर्ससाठी मोठी बातमी| 'या' नंबरपासून सावधान, नाहीतर होईल मोठं नुकसान

Updated: May 28, 2022, 10:03 AM IST
तुमचं Whatsapp हॅक होण्याचा धोका! पाहा कसं टाळता येईल title=

मुंबई : जसं ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण वाढत आहे तसंच हॅकिंगचा धोकाही दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना उल्लू बनवून त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जात आहेत. Whatsapp ची सिक्युरिटी तोडून आता अकाउंटचा अॅक्सीस मिळवला जात आहे. 

जर तुम्हाला तुमचं Whatsapp अकाउंट सुरक्षित ठेवायचं असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. याबाबत CloudSEk चे CEO राहुल यांनी महत्त्वाची माहिती दिली. 

युजरला एक कॉल येतो आणि त्याला एका विशिष्ट नंबरवर फोन करायला सांगितला जातो. युजरने तो नंबर डायल केला की हॅकर्स तुमच्या Whastapp चा ताबा मिळवतात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी असं काही करायला सांगितलं तर सावध राहाणं गरजेचं आहे. 

जर चुकून तुम्ही असं काही केलं तर मोठं नुकसान होऊ शकतं. आता तर Whatsapp पेमेंटही सुरू झालं आहे. त्यामुळे हॅकर्स अगदी सहज तुमच्या खात्यापर्यंतही पोहोचू शकतात. 

युझर्स तुमच्या लिस्टमधील लोकांकडे पैसे मागू शकतात किंवा तुमची कोणतीही माहिती लीक करू शकतात किंवा तुमच्या खात्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांना मिळू शकतो. त्यामुळे या सगळ्यात सावध राहायला हवं. 

जर तुम्हाला 67 किंवा 405 या क्रमांकावरून फोन आला तर चुकूनही उचलू नका. या नंबरला कोणतीही माहिती देऊ नका. Wahtsapp नंबरवर टू स्टेप व्हेरिफिकेशन ठेवा. तुमच्या Whatsapp ला पासवर्ड सेट करा. ज्यामुळे अकाउंट हॅक होणार नाही.