WhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट

सध्या युझर्स एक अकाउंट केवळ एका फोनमध्येच चालवू शकत होते. जर एखाद्या युझर्सला दुसर्‍या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करायचा असेल, तर तो पहिल्या फोनवरून स्वत:च निघून जातो.

Updated: Jun 5, 2021, 10:12 PM IST
WhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युझर्ससाठी आणखी एक नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केलेले नवीन फीचर आश्चर्यकारक आहे. मल्टी डिव्हाइस सपोर्ट असे या नवीन फीचरचे नाव आहे, जे WABetaInfoने अपडेट केले आहे. WABetaInfoच्या मते, नवीन फीचर अपडेट केल्यावर, युझर्स एकाच वेळी चार उपकरणांवर एकच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सक्रिय ठेवू शकतील.

सध्या युझर्स एक अकाउंट केवळ एका फोनमध्येच चालवू शकत होते. जर एखाद्या युझर्सला दुसर्‍या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करायचा असेल, तर तो पहिल्या फोनवरून स्वत:च निघून जातो. परंतु मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर लॉन्च झाल्यानंतर ही समस्या संपली आहे. नवीन फीचरमध्ये सुविधा देण्यात आली आहे की, युझर्सना एका फोनवरून दुसर्‍या फोनवर व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन केल्यानंतर पहिल्या डिव्हाइसमधील व्हॉट्सअ‍ॅप डिलिट किंवा निघून जाणार नाही.

वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअ‍ॅपची मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर सक्रिय करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी वेरीफाईड झाल्यानंतर एका व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवरुन चार डिव्हाइसमध्ये ते वापरले जाऊ शकते.

मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅप आता Disappearing Mode आणि View Once फीचर आणण्याची योजना आखत आहे. Disappearing Mode च्या फीचरमध्ये, मॅसेज काही वेळानंतर Disappear होतो, म्हणजेच निघून जातो. व्हॉट्सअ‍ॅपच्या View Once फीचर Disappearing Mode फीचर सोबत काम करेल. यामध्ये युझर्स चॅट दरम्यान फोटो आणि व्हीडिओ पाहण्यास सक्षम असतील, परंतु ते त्यांना डाऊनलोड करु शकणार नाहीत.