WhatsAppमधील ५ मजेदार फिचर्स, जाणून घ्या...

चॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp ने सर्वोत्तम मॅसेंजिंग एप बनण्यासाठी खूप सारे बदल केलेयत

Updated: Dec 3, 2020, 11:51 AM IST
WhatsAppमधील ५ मजेदार फिचर्स, जाणून घ्या... title=

मुंबई : चॅटींगसाठी प्रसिद्ध असलेल्या WhatsApp ने सर्वोत्तम मॅसेंजिंग एप बनण्यासाठी खूप सारे बदल केले आहेत. ग्राहकांची गुंतवणूक वेळ वाढवण्यासाठी WhatsApp ने छान फिचर्स आणलेयत. हे फिचर्स वापरले असाल. यावर्षात कोणते फिचर्स आले त्याबद्दल जाणून घेऊया..

ग्रुप कॉलची लिमिट वाढली

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आणि लॉकडाऊनदरम्यान WhatsApp ने व्हिडीओ कॉलची (Video Call)मर्यादा ४ ने वाढवून ८ करण्यात आली. त्यानंतर या फिचरची चांगली चर्चा झाली. लॉकडाऊन दरम्यान मित्र आणि परिवारासाठी  हे फिचर वरदान ठरलं होतं. तुम्ही अजूनही ८ जणांसोबत व्हिडीओ कॉल केला नसेल तर आजच ट्राय करा.

एडव्हान्स सर्च 

व्हॉट्सएपवर खूप चॅट करणाऱ्यांसाठी एडव्हान्स सर्च फायदेशीर ठरणार आहेत. कोणतीही फाईल किंवा चॅट कोणत्याही अडचणीशिवाय शोधू शकतात. यामुळे व्हॉट्सएप खूप पॉवरफूल एप बनलंय.

पेमेंट

WhatsApp पेमेंट हे या वर्षातील सर्वात नवे फिचर आहे. WhatsApp ने यूपीआय पेमेंट (UPI Payment) सोबत चॅटींगचे फिचर देखील जोडलंय. आतापर्यंत गूगल पे (Google Pay) आणि फोन पे (Phone Pe) या एप्सवर पैशांची देवाणघेवाण करता येत होती. पण आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी व्हॉट्सएप पेमेंट हा चांगला पर्याय बनलाय.

डार्क मोड 

मेसेजिंग एपमध्ये डार्क मोडचा समावेश देखील करण्यात आलाय. टेकच्या दुनियेत डार्क मो़ड सध्या प्रसिद्ध आहे. गूगल (Google), फेसबुक (Facebook) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft)सारख्या कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स डार्क मोडमध्ये आणलेयत. या पार्श्वभुमीवर WhatsApp ने देखील डार्क मोड सुरु केलंय.

फाईल डिलीट

व्हॉट्सएपवर खूप सारे फोटो, व्हिडीओ आणि मेसेज येत असतात. अशावेळी मोबाईलच्या वेगवेगळ्या फोल्डरवरमध्ये जाऊन ऑडीओ, व्हिडीओ आणि फोटो डिलीट करण्याचं टास्क असतं. पण व्हॉट्सएपच्या नव्या फिचर्सच्या मदतीने एकावेळी या फाईल डिलीट करता येऊ शकतात. तुमच्या मोठ्या फाईल देखील सहजपणे ओळखू शकता.