मुंबई : हाऊस पार्टी हे ॲप्लिकेशन अनेकांमार्फत लॉकडाऊन दरम्यान वापरले जात आहे . कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये, म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या ७ दिवसात अनेकांनी हे अॅप आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केलं, त्यामुळे हे अॅप सध्या ट्रेडिंग ॲप्लिकेशन आहे. विशेष म्हणजे हाऊस पार्टी तरूणाईत सध्या चांगलेच चर्चेत होतं. अँड्रॉइड आणि आयओएस अशा अनेक स्तरावर हे अॅप डाऊनलोड करून नंबर वन ट्रेडिंगवर होतं.
अनेकांनी सरकारने एकवीस दिवस लॉकडाऊन सांगितल्यावर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात जास्तीत जास्त लोक मोबाईल फोनचा वापर करत आहेत. सोशल मीडिया वेबसाईट फेसबूक व्हाट्सअप मेसेंजरवर अशा अनेक ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात वापरला जात आहे. हे मागील आठवड्यापासून पाहायला मिळत आहे.
हाउस पार्टी असे अनेक अॅपलिकेशन सुद्धा सध्या चर्चेत आहेत दोन आठवड्यांपूर्वी हाऊसपार्टी अॅप १४५० व्यी क्रमांकावरील लोकप्रिय अॅप म्हणून अॅपल अॅप स्टोअरला भारतात होते परंतु नंतर ट्रेंडिंग वन ला गुगल प्ले ने हे ॲप्लिकेशन दाखवलं आहे . अॅप स्टोअरला हाऊसपार्टी हे चौथ्या क्रमांकाचा लोकप्रिय ॲप्लीकेशन म्हणून ओळखले जाते
नावाप्रमाणे व्हर्चुअल हाऊस पार्टी ही संकल्पना या अप्लिकेशनमध्ये मांडण्यात आलेली आहे. अॅप्लीकेशनमुळे तुम्ही तुमच्या मित्रांना एकत्र बोलवून कॉल चॅटद्वारे चर्चा करू शकतात. गप्पा मारू शकतात आणि विशेष म्हणजे यांच्यामध्ये किती मित्र जोडले जावे, यासंबंधी कुठलेही निर्बंध नाहीत. एकाच वेळी अनेक मित्रमंडळी व्हिडिओ कॉलला जोडले जातात.
हाऊस पार्टी हे ॲप्लिकेशन फक्त व्हिडिओ कॉलवर बोलणाऱ्यांची संख्या मर्यादित नाही, म्हणून लोकप्रिय आहे. हॅन्डस अप , ट्रिवीआ , चिप्स आणि क्विक ड्रॉ असे अनेक खेळ आहेत की जे तुम्हाला तासनतास गुंतवून ठेवू शकतात.
या अॅपब्लिकेशनची खास बाब ही आहे की व्हिडीओ कॉलिंगसोबत तुम्ही एकत्र गेम खेळू शकतात. त्याकरीता तुम्हाला वेगवेगळ्या दोन ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याची गरज नाही आणि सगळ्या मित्रांना एकत्र घेऊन ऑनलाईन मजेशीर पद्धतीने पार्टी करू शकतात
हाऊस पर्टी अप्लिकेशनमध्ये एक वेगळीच खासियत येत आहे, ज्यात ओपन रूममध्ये लोक एकमेकांशी गप्पा मारू शकतात. जर एखाद्याला वाटत असेल त्या दोन व्यक्ती मधलं किंवा ग्रुपमधील आपल्यातील संवाद कोणीही ऐकू नये, तर ते प्रायव्हेट रूम किंवा प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन आपल्यातील संभाषण लॉक करू शकतात.
आपण एखाद्या खोलीमध्ये पार्टी करताना एकमेकांशी गप्पा मारतो त्याच पद्धतीने आहे. तर दुसरीकडे काही लाईव्ह व्हिडिओ कॉल चालू असतात. ऑनलाईन, ऑनगोईंग व्हिडिओ कॉल्समध्ये तुम्ही कधीही प्रवेश करू शकतात. हव्या त्या मित्रांशी गप्पा मारू शकतात, तुम्हाला कोणी इन्व्हाईट केलं नसेल, तरी तुम्ही संवाद अनेकांशी चॅट करू शकतात.
एकीकडे हाउस पार्टी आपलिकेशन अनेकांशी संवाद वाढवत असताना दुसरीकडे मात्र कालपासून #deletehouseparty डिलीट हाऊस पार्टी हे ट्विटरवर ट्रेडिंग होत आहे .
युझरने आपल्या पर्सनल डेटा चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे, सेन्सिटिव्ह पर्सनल माहिती ही वेगवेगळ्या पद्धतीने चोरली जात असल्याची तक्रार केली. अकाउंट हॅक करणे इन्स्टाग्राम
अकाउंट हॅक करणे, असे अनेक प्रकार यामध्ये समोर आलेले आहेत.
काही वापरकर्त्यांनी तर पैसे सुद्धा चोरले गेल्याची कंप्लेंट नोंदवली आहे, हाऊस पार्टी वापरणे सुरक्षित नाही, या भीतीमुळे अनेकांनी सध्या आहे अॅप्लिकेशन अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आहे.
हाऊस पार्टी अॅप्लिकेशनेन हे स्पष्ट केलं आहे की, वापरकर्त्यांच्या कुठलाही डेटा हा आम्ही कुठल्याही गैर पद्धतीने वापरत नाही. तुमची वैयक्तिक माहिती ही अत्यंत सुरक्षित आहे आणि हाउस पार्टी अॅपलिकेशन बदनाम करण्यासाठी काहींनी या चुकीच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
डेटा सुरक्षित आहे कोणीही तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकत नाही, याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत, असे स्पष्टीकरण ॲप्लिकेशनकडून व्टीटरव्दारा दिलं आहे.
तपासणीचा एक भाग म्हणून कंपनीने जो कोणी सर्वप्रथम युजर डेटा सुरक्षित नाही किंवा अशा पध्दतीने कॅम्पेन केले जाते आहे, हे पुराव्यानिशी निदर्शनास आणून सिध्द करेन, त्याला 1,000,000 डॉलर देण्याची घोषणा केली आहे.