दोन रिअर कॅमेऱ्यासहीत शाओमीचा Mi8 लॉन्च

कंपनीनं या कार्यक्रमात आपला शाओमी Mi8 SE स्मार्टफोनदेखील लॉन्च केलाय. 

Updated: May 31, 2018, 08:58 PM IST
दोन रिअर कॅमेऱ्यासहीत शाओमीचा Mi8 लॉन्च  title=

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi8 गुरुवारी लॉन्च केलाय. शाओमीनं आपल्या वार्षिक प्रोडक्ट लॉन्च इव्हेंटमध्ये हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. शाओमी Mi8 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे, इन्फ्रारेड फेस अनलॉक आणि २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. यासोबतच Xiaomi Mi 8 Explorer Edition देखील लॉन्च करण्यात आलं. यामध्ये थ्रीडी फेस रिकग्निशन, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ट्रान्सपरंट बॅक यांसारखे एक्सक्लुझिव्ह फिचर आहेत. कंपनीनं या कार्यक्रमात आपला शाओमी Mi8 SE स्मार्टफोनदेखील लॉन्च केलाय. 

शाओमी Mi8चे फिचर्स

यामध्ये ६.२१ इंचाचा फुल एचडी (१०८०X२२४८ पिक्सल) सॅमसंग एमोलेड डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर वापरण्यात आलाय. ६ जीबी आणि ८ जीबी रॅम व्हेरिएन्टमध्ये हा फोन उपलब्ध असेल. मागच्या भागावर ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. याची पोझिशन आयफोन एक्सप्रमाणे आहे. यामध्ये ३४०० एमएएचची बॅटरी देण्यात आलीय. 

शाओमी Mi8 ची किंमत

शाओमी Mi8 ची किंमत २,९९९ चीनी युआनपासून (जवळपास २८,६०० रुपये) सुरू होते. हा ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचं व्हेरिएन्ट आहे.... तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजचं व्हेरिएन्टसाठी २,९९९ चीनी युआन (जवळपास ३१,६०० रुपये) मोजावे लागतील... ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज व्हेरिएन्ट ३,२९९ चीनी युआनमध्ये (जवळपास ३४,८०० रुपये) उपलब्ध असेल. 

हा स्मार्टफोन व्हाईट, गोल्ड, लाईट ब्लू आणि ब्लॅक रंगात उपलब्ध असेल.