रॉयल एनफिल्डची 'पेगासस ५००' भारतात लॉन्च

येत्या १० जुलैपासून रॉयल एनफिल्ड पेगासस ५०० ची ऑनलाईन विक्री सुरू होईल.

Updated: May 31, 2018, 07:22 PM IST
रॉयल एनफिल्डची 'पेगासस ५००' भारतात लॉन्च title=

पेगासस ५००मुंबई : रॉयल एनफिल्डनं आपली नवी कोरी क्लासिक 'पेगासस ५००' भारतीय बाजारात लॉन्च केलीय. दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरण्यात आलेल्या RE/WD १२५ मोटारसायकलची प्रेरणा घेत या बाईकची निर्मिती करण्यात आलीय. त्या काळात या बाईकचा वापर ब्रिटिश पॅराट्रुपर्स करत होते... आणि या बाईकला फ्लाइंग फ्ली नावानं ओळखलं जात होते. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीनं या बाईकचे केवळ १००० युनिटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय. लिमिटेड एडिशन बाईक असल्यानं यातली केवळ २५० युनिटस भारतात विकले जाणार आहेत... तर १९० युनिटस् ब्रिटनला पाठवण्यात येतील. येत्या १० जुलैपासून रॉयल एनफिल्ड पेगासस ५०० ची ऑनलाईन विक्री सुरू होईल.


पेगासस ५००

 

बाईकची खासियत

पेगासस ५०० च्या दोन्ही बाजुंना मिलेट्री स्टाईलमध्ये डिग्गीज असतील. सायलेंसर, रिम, बाईक स्टार्ट करण्याची किक, पॅडल आणि हेडलाईटचं पॅनल काळ्या रंगात आहे. सर्व्हिस ब्राऊन आणि ऑलिव्ह ड्रेब ग्रीन अशा दोन रंगांत ही बाईक उपलब्ध असेल.   

बाईकचे फिचर्स

बाईकचं इंजिन ४९९ सीसीचं आहे. ही एक एअर कुल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे २७.५ PS जनरेट करतं आणि ४१.३ Nm पीक टॉर्क करते. चेसिस, ब्रेक आणि टायर अगोदरच्या रॉयल एनफिल्ड़ क्लासिक ५०० सारखेच असतील. या बाईकमध्ये ५ स्पीड गिअर बॉक्स आहेत. कंपनीनं या बाईकच्या फ्युएल टँकवर २५० व्या एअरबॉर्न लाईट कंपनीच्या आठवणीत एक सीरियल क्रमांकही दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, एअरबॉर्न लाईट कंपनीनं दुसऱ्या महायुद्धादरम्यान सेवा प्रदान केली होती.


पेगासस ५००

 

काय आहे किंमत?

भारतीय बाजारात (महाराष्ट्र) या बाईकची किंमत २.४९ लाख (ऑन रोड) निर्धारित करण्यात आलीय. तर दिल्लीत या बाईकची किंमत २.४० लाख रुपये असेल. या बाईकच्या लॉन्चिंग किंमतीत हेल्मेट, पॅनिअर्स आणि टी-शर्टचाही समावेश आहे.