एसी-कुलर नाहीये, पंख्याचा असा वापर करुन ठेवा घराला ठंडा-ठंडा कूल कूल

Summer Cooling Tips: उन्हाळ्याच्या दिवसात घरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आपण अनेक युक्ता लढवत्या. आम्हीही या सोप्या टिप्सनी तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: May 19, 2023, 06:13 PM IST
एसी-कुलर नाहीये, पंख्याचा असा वापर करुन ठेवा घराला ठंडा-ठंडा कूल कूल title=
you can keep cool your home with fan without ac know the tips

Summer Home Cooling Tips: गरमीच्या दिवसात घर थंड ठेवणे हे खूप कठिण काम असते. बाहेरुन घरात गेल्यानंतर अधिक उष्मा जाणवतो. जर घरात एसी किंवा कुलर नसेल (summer cooling tips) तर अधिकच अवस्था बिकट होते. अशातच आम्ही तुम्हाला एसी, कुलर नसतानाही घर थंड ठेवण्याच्या टिप्स सांगणार आहोत. (Summer Tips) 

राज्यात अवकाळी पावसानंतर उकाडा अधिक वाढला आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला आहे. उष्मा वाढल्याने वीजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. घरात सतत एसी, कुलर सुरू असतात, अशाने वीजबिलही वाढते. तुम्ही केवळ पंख्याच्या सहाय्यानेही घरात थंडावा टिकवून ठेवू शकतात. पंख्याचे काम हे फक्त हवा सर्क्युलेट करणे इतके आहे. पंख्यामुळं थंडावा टिकून राहू शकत नाही. मात्र आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्यामुळं तुम्ही फॅनचा वापर करुन घर थंड ठेवू शकता. 

पंख्यासमोर बर्फ ठेवा

गरमीच्या दिवसात घर थंड ठेवण्यासाठी पंख्यासमोर बर्फाने भरलेले एखादे भांडे ठेवा किंवा बादली ठेवा. पंख्याची हवा त्या बादलीतील बर्फावरुन जाताच थोडा थंडावा येतो. या टिप्समुळं खोलीत थंड व ताजी हवा तयार होईल. 

१ लीटर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरून फ्रिजरमध्ये बर्फ होण्यासाठी ठेवा. बर्फ झाल्यानंतर आता एका ट्रेमध्ये बॉटल काढून पंख्याच्या जवळ ठेवा. जेणेकरुन थंड बॉटलच्या संपर्कात येऊन हवादेखील थंड होईल. त्यामुळं घरातील उष्णता कमी होऊन थंडावा निर्माण होतो. 

दारं-खिडक्यांचा वापर करा

उष्णतेचा अधिक त्रास रात्री जाणवतो. दारं-खिडक्या बंद करुन घेतल्यानंतर उष्मा अधिक जाणवतो. तसंच, नीट झोपही येत नाही. तुमच्याकडे एकच पंखा असेल तर त्या तो  चालू करुन घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. तसंच किचनमधील एग्जोस्ट फॅनदेखील सुरू करुन ठेवा. असं केल्यास घरातील गरम हवा बाहेर फेकली जाईल आणि बाहेरुन थंड हवा आत येईल. तर, पंखा हवा सर्कुलेट करुन थंडावा टिकवून ठेवेल. पण घरातील खिडक्यांवर जाळी लावली असेल याची खात्री करुनच खिडक्या उघड्या ठेवा अन्यथा खिडक्यांमधून डास किंवा किडे येण्याची भीती असते. 

या टिप्सचा वापर करा

एसी नसतानाही घर थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत. यात सूती बेडशीट आणि कपडे वापरे. त्याचबरोबर घरात छोटी रोपे लावा. सौम्य रंगाचे पडद्यांचा वापर करा. वरील टिप्सचा वापर करुन तुम्ही घर एकदम कुल ठेवू शकता.