Calculatorमधील MS, MR, MC, M+ आणि M- या बटणांचा वापर काय?

Calculator मुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड करणे झटक्यात शक्य होते, ते ही अगदी अचूक.

Updated: May 12, 2021, 09:03 PM IST
Calculatorमधील MS, MR, MC, M+ आणि M- या बटणांचा वापर काय?

मुंबई : तुम्हाला मोठ मोठ्या संख्यांचे हिशोब करायचा असो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न सोडवायचे असो, त्यामधील बेरीज-वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी कॅल्क्युलेटर महत्वाची भूमिका बजावतो. Calculator मुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड करणे झटक्यात शक्य होते, ते ही अगदी अचूक. परंतु तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि  संख्या या व्यतिरिक्त अशी अनेक बटणे पाहिली असतील. परंतु त्याचा वापर आपल्यापैकी फार कमी लोकांनी केला असणार, कारण लोकांना ते बटण नक्की काय काम करते याची माहिती नाही.

कॅल्क्युलेटरमध्ये  MS, MR, MC, M+, M-, C आणि CE हे बटणं तुम्हाला दिसतात. परंतु या बटणांचा अर्थ काय आहे आणि ते कसे काम करतात हे जाणून घ्या.

MS (Memory Store) :  हिशोब करताना तुम्हाला ज्या संख्येची वारंवार गरज पडणार आहे, ती संख्या दाबा आणि मग MS दाबा. त्यानंतर तो नंबर कॅल्क्युलेटरच्या मेमरीमध्ये आपोआप सेव्ह होईल आणि तुम्हाला तो नंबर पुन्हा पुन्हा टाईप करावा लागणार नाही.

M R (Memory Recall) : हे बटण दाबल्यास सेव्ह केलेली संख्या समाविष्ट होते.

MC (Memory Clear) : हे बटण दाबून, जतन केलेली संख्या मेमरीमधून काढली जाते आणि त्यामुळे तुम्ही इतर कोणतीही संख्या पुन्हा सेव्ह करण्यात सक्षम व्हाल. या व्यतिरिक्त, कॅल्क्युलेटरमध्ये (M+) आणि (M-) नावाची दोन महत्वाची बटणे देखील आहेत जी MS, MR  आणि MC ला सपोर्ट करण्याते कार्य करतात.

M+ : MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला दुसऱ्या संख्येत जोडण्यासाठी, M+ दाबा.

M-: MS द्वारे सेव्ह केलेल्या नंबरला कोणतीही संख्येमधून कमी करण्यासाठी, (M-) दाबा.

त्याचप्रमाणे C आणि CE हे देखील कॅल्क्युलेटरची दोन महत्त्वाची बटणे आहेत. बहुतेक लोकांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. कॅल्क्युलेटरमध्ये टाकलेला क्रमांक किंवा संख्या मिटविण्यासाठी या दोन्ही बटणांचा वापर होतो. परंतु या दोघांमध्ये थोडा फरक आहे.

हिशोबा दरम्यान, CE बटण दाबल्याने शेवटची संख्या काढून टाकली जातो, तर C बटण दाबल्यामुळे स्क्रीनमधून संपूर्ण संख्या निघून जाते आणि शून्य येतो.