तुमच्याच फोनने तुमची हेरगिरी, कसा शोधायचा गुप्तहेर...वाचा

हातात फोन घेऊन तुम्ही जगातील सर्वांची खबरबात घेऊ शकता. पण याच फोनद्वारे तुमची देखील कुणीतरी खबरबात घेऊ शकतं.

Updated: Nov 2, 2020, 10:50 PM IST
तुमच्याच फोनने तुमची हेरगिरी, कसा शोधायचा गुप्तहेर...वाचा title=

मुंबई : हातात फोन घेऊन तुम्ही जगातील सर्वांची खबरबात घेऊ शकता. पण याच फोनद्वारे तुमची देखील कुणीतरी खबरबात घेऊ शकतं. तुम्हाला हे ऐकण्यात जरी थोडं वेगळं वाटत असलं, तरी हे सत्य आहे. तुमच्याच फोनचा वापर करुन तुमचीच हेरगिरी होवू शकते. एवढंच काय हे सर्वात एडव्हान्स आणि स्मार्टफोन आयफोनच्या माध्यमातून देखील होवू शकतं. यावर लगाम लावण्यासाठी आयफोनने तसं फीचरही आता दिलं आहे.

Zee News ने दिलेल्या बातमीनुसार, तुमच्या आयफोननेच तुमची हेरगिरी होवू शकते, पण ही हेरगिरी होते का? हे लगेच सहज समोर आणता येऊ शकतं. तुमचा आयफोन तुम्हाला संकेत देईल की बाहेरची व्यक्ती तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करत आहे.

तुम्ही कधी तुमच्या आयफोनच्या फ्रंट कॅमेऱ्याच्या बाजूला ब्लिंक होणार लाईट बघितला आहे. कॅमेऱ्याच्या बाजूला ब्लिंक होणारा हिरवा लाईट किंवा ऑरेंज लाईट हेच सांगतो की तुमच्या फोनमध्ये हेरगिरी होतेय. हा ब्लिंक होणारा लाईट सांगतोय तुमचं रियल टाईम आणि लोकेशनची कुणीतरी माहिती घेतंय.

नवीन फीचर

अॅप्पलने सध्या आपलं ऑपरेटिंग सॉफ्टवेअर अपग्रेड केलं आहे. अॅप्पलने आपल्या सर्व आयफोनसाठी नवीन सॉफ्टवेअर जारी केलं आहे. या अपडेटेड सॉफ्टवेअरमध्ये नवीन फीचर देण्यात आलं आहे.

या फीचरच्या माध्यमातून जर कुणी तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा किंवा स्पीकर ऑन करत असेल, तर हा ब्लिंकर चालू होतो. हा ब्लिंकर म्हणजे लुकलुकता लाईट जेव्हा सुरु होतो, तेव्हा समजा तुमचा कॅमेरा अॅक्टिव्ह आहे. हिरवा लुकलुकणारा लाईट कॅमेऱ्यासाठी आणि ऑरेंज लाईट आवाजाचं रेकॉर्डिंग सुरु असल्याचं दाखवतो.

असा करा बचाव

अॅप्पलच्या नव्या सॉफ्टवेअरनुसार, तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यावर आणि ऑडिओवर स्वत: कंट्रोल करु शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कंट्रोल सेंटरमध्ये जावून सेटिंग करावं लागेल. यात तुम्हाला दिसेल तुम्ही कोणत्या अॅपला ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची परवानगी दिली आहे. जर कोणता अॅप तुमच्या परवानगीशिवाय ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्ड करत असेल, तर ते तुम्ही बंद करु शकतात.