मुंबई : गुगल प्ले स्टोरमधून सरसकट एप्स डाऊनलोड करत असाल तर सावधान ! कारण यातले बरेच एप हे तुमच्यासाठी धोकादायक आहेत. विशेषत: मोबाईलवर गेम्स खेळण्याची आवड असलेले युजर्स रोज नव्या गेम्सच्या शोधात असतात. पण गुगल प्ले स्टोरने असे २१ गेमिंग एप्स शोधलेयत जे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात.
युजर्सना जाहीराती दाखवून अनेक एप्स डाऊनलोड करण्याचे प्रलोभन दिले जाते. तुम्ही देखील या प्रलोभनांना बळी पडत असाल तर वेळीच सावध व्हा.
हे २१ एप गुगल प्ले स्टोरमध्ये आहेत. जे मोफत असून जाहीरातींमधून हे पैसे कमावतात. जे युजर हे एप डाऊनलोड करतात त्यांना जाहीराती पाहाव्या लागतात. हे गेम्स सुरु होण्याआधी जाहीराती येतात. ज्यांना स्किप करण्याचा पर्याय दिला जात नाही. यामध्ये युजर्सचा बराच वेळ जातो. पैसे कमावण्यासाठी ही शक्कल एप्स बनवणाऱ्यांकडून केली जाते.
या एप्सवर डेटा चोरी करण्याचा आरोप नाहीय. पण हे २१ एप्स ८ मिलियन्सहून जास्तवेळा डाऊनलोड केले गेले आहेत.
२१ गेम एप्स
१)-शूट देम, २)-क्रश कार, ३)-रोलिंग स्क्रॉल, ४ -हेलीकाप्टर अटैक, ५)-असासियन लीजेंड, ६)-हेलीकाप्टर शूट, ७) -रग्बी पास, ८)-फ्लाइंग स्केटबोर्ड, ९)-आयरन इट, १०)-शूटिंग रन, ११)-प्लांट मॉन्स्टर, १२)-फाइंड हिडन, १३)-फाइंड 5 डिफरेंस, १४)-रोटेट शेप, १५)-जंप जंप, १६)-फाइंड द डिफरेंस-पज़ल गेम, १७)-स्वे मैन, १८)-मनी डिस्ट्रॉयर, १९)-डेजर्ट अगेंस्ट, २०) -क्रीम ट्रिप, २१)-प्रॉप्स रेस्क्यू