अकोला : एका महिलेने घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले. त्यामुळे जातपंतचायतीने तीला थूंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. एका अधिकाऱ्याच्या मते या महिलेवर पंचायतीने 1 लाखाचा दंड देखील आकारला आहे.
जात पंचायतीच्या फर्मानानंतर हिम्मत दाखवून महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या महिन्याची आहे. जळगावात राहणाऱ्या एका महिलेने तक्रार केल्यानंतर महाराष्ट्र बहिष्कार संरक्षण अधिनिय 2016 अंतर्गत जात पंचायतीच्या 10 सदस्यांविरोधात FIRदाखल करण्यात आली आहे.
महिलेने जात पंचायतीविरोधात चोपडा(जळगाव)येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण अकोला पिंजर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. ही घटना 9 एप्रिल रोजी अकोल्यातील वडगाव येथे घडली होती. नाथ जोगी समाजात दूसरे लग्न स्विकार केले जात नसल्यामुळे पंचायतीने तीला शिक्षा सुनावली होती.
पीडितेचे पहिले लग्न 2011 मध्ये झाले होते. 2015 मध्ये तिने पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. 2019 मध्ये तिने दुसरे लग्न केले. पंचायतीने महिलेच्या कुटूंबाला बोलावून तिला शिक्षा सुनावली. त्यावेळी पीडिता तेथे उपस्थित नव्हती. या शिक्षेमध्ये पंचायतीचे सदस्य केळ्याच्या पानावार थुंकतील आणि ते पीडितेने चाटावं. तसेच पंचायतीला 1 लाख रुपये शिक्षा म्हणून देण्याचे पीडितेला सांगितले गेले.
पीडितेने पंचायतीच्या अटी पूर्ण केल्यास तिला पुन्हा समाजात घेता येईल. असे असले तरी पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तरी अकोला पोलिसांनी पंचायतीच्या दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.