पुण्यातील शाळेत महिला पोलीस अधिकाऱ्याचा राडा

पालिकेचे एक पथक शाळेच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आले होते.

Updated: Jul 25, 2018, 10:09 PM IST
पुण्यातील शाळेत महिला पोलीस अधिकाऱ्याचा राडा title=

पुणे: महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान शाळेच्या संस्थाचालकांसह शिक्षकांना एका महिला पोलीस अधिकाऱ्याने विनाकारण मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली. धानोरीतल्या प्रगती इंग्लिश स्कूलमधला हा प्रकार आहे. 

पालिकेचे एक पथक शाळेच्या परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर पोलिसही होते. मात्र, विद्यार्थी शाळेतून बाहेर गेल्यानंतर कारवाईला सुरुवात करावी, असे शाळेचे संस्थाचालक आणि शिक्षकांचे म्हणणे होते.

मात्र, हे ऐकल्यानंतर पोलीस निरीक्षक दिपाली धाडगे आक्रमक झाल्या. त्यांनी संस्थाचालक किशोर माने आणि मध्यस्थी करत असलेल्या शिक्षकांना चोप दिला. एवढेच नव्हे तर संस्थाचालकांशी बोलत असलेल्या पोलीस शिपायाच्याही त्यांनी कानशिलात लगावली.