सरकारी रुग्णालायाच्या गलथान कारभारामुळे मृतदेह सडला; अशी वेळ कोणावरही येऊ नये

कोल्हापूरातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील फ्रिजर बंद असल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Jul 26, 2022, 10:30 AM IST
सरकारी रुग्णालायाच्या गलथान कारभारामुळे मृतदेह सडला; अशी वेळ कोणावरही येऊ नये title=

कोल्हापूर : कोल्हापूरातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील फ्रिजर बंद असल्याची माहिती मिळतेय. फ्रिजर बंद पडल्याने एक मृतदेह सडल्याचे समोर आले आहे. सडलेल्या मृतदेहावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शवविच्छेदन गृहातील फ्रिजर गेल्या 6 दिवसापासून बंद आहे. रुग्णालय प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा फ्रिजर बंद आहे. 

फ्रिजर बंद पडल्याचे शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला कळवूनदेखील प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.