कोल्हापूर: मी सरकार हलत झुलत ठेवलं नाही, जे करायचं ते उघडपणे केले, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते मंगळवारी कोल्हापूर येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जागावाटपात शिवसेनेने केलेली तडजोड आणि अन्य मुद्द्यांवरील भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी म्हटले की, आता रात्र थोडी आणि सोंग फार झाली आहेत. आपल्याकडे अजिबात सोंग नाही. परंतु, काही लोक आता सोंग घेऊन बाहेर पडले आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
राणे म्हणाले, भाजपची शिस्त पाळणार!, सीएमचा सबुरीचा सल्ला
तसेच आगामी काळात सत्तेत आल्यानंतर आपण ठामपणे बोलणारच, असेही त्यांनी म्हटले. मी सत्तेमध्ये राहून जनतेचा आवाज बुलंद करत आहे. उद्या सरकारचा एखादा मुद्दा पटला नाही तर मी बोलणारच, असेही उद्धव यांनी म्हटले.
नाशकात ३५ शिवसेना नगरसेवकांची बंडखोरी
यावेळी उद्धव यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरही भाष्य केले. राम मंदिर व्हायलाच पाहिजे. पण राम मंदिर उभे करण्यासाठी जे हात लागतील त्यांना कामही मिळालंच पाहिजे, असेही उद्धव यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे राज्यभरात जोमाने प्रचार करत आहेत. मात्र, राजकीय वर्तुळाला बुधवारी कणकवलीत होणाऱ्या त्यांच्या सभेची उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी नारायण राणे यांचा भाजपप्रवेश पार पडला. त्यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीतील सभेत राणे यांच्या भाजप प्रवेशावर कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.