हा समोसा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहा...

 व्हिडीओत पाहा, गुरूकृपा समोसा आहे तरी कसा आणि कुठे आहे हे ठिकाण आणि संपूर्ण पत्ता

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 17, 2017, 05:49 PM IST

मुंबई : गुरूकृपाचा समोसा तू कधी खाल्ला आहेस का? असं तुम्हाला जर कुणी सांगितलं, तर तुम्हाला असंच वाटेल, की समोसा आणि त्यात चवीचा काय फरक असणार आहे. मात्र तुम्ही जेव्हा सायन पूर्वेला स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या गुरूकृपाचा समोसा खाल तेव्हा, या समोसा आणि त्याची चव काहीतरी वेगळीच असल्याचं तुम्हाला लक्षात येईल.

आधी एक छोटीशी टपरी

गुरूकृपा समोसा ही आधी अगदी एक छोटी टपरी होती,  म्हणजे १९७५ साली, यानंतर व्यवसाय वाढला आणि कारभार वाढण्याचं कारण म्हणजे चव, मुंबईतील बहुतांश सिनेमागृहात हेच समोसे जातात. 

या गुरुकृपा हॉटेलचे हेमा मालिनी यांनी उदघाटन केले होते, पण अनेक वर्षांपासून या समोस्यात चवी मध्ये बदल झाला नाही हे विशेष असल्याचं आमचे प्रेक्षक आनंद मोकाशी यांनी म्हटलं आहे.

वरील व्हिडीओत पाहा, गुरूकृपा समोसा आहे तरी कसा आणि कुठे आहे हे ठिकाण आणि संपूर्ण पत्ता.

हा समोसा तेवढा स्वस्तही नाही, हे देखील खरं असलं, तरी हा समोसा खाण्यासाठी येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दी असते. यात चटणीसोबत प्लेटमध्ये दोन समोसे खाल्ल्यानंतर आणखी समोसा खायला पाहिजे हे तुम्हाला नक्की वाटेल. एकदा या गल्लीत गेलात तर या गल्लीत एकमेव दुकानाचा थाटमाट आणि गजबजलेलं वातावरण दिसेल, तो म्हणजे गुरूकृपाचा समोसा.