जागतिक महिला दिन : विमान कंपन्यांचे महिलांना खास गिफ्ट

जागतिक महिला दिनाच्या औच्यित्य साधत प्रत्येकजण महिलांना सरप्राइज देतायत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 8, 2018, 11:35 AM IST
 जागतिक महिला दिन : विमान कंपन्यांचे महिलांना खास गिफ्ट  title=

नवी दिल्ली : जागतिक महिला दिनाच्या औच्यित्य साधत प्रत्येकजण महिलांना सरप्राइज देतायत. देशातील विमान कपंन्यांनीही अशाच प्रकारे खास गिफ्ट दिलेय.

विमान कंपन्यांचे प्लान

एयर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा, स्पाइसजेट आणि सरकारी कंपनी एयर इंडिया यांनी महिलांसाठी खास प्लान आखलाय.

महिला दिनानिमित्त विमानाचे उड्डाण महिला चालक करणार आहेत. चालक दल पूर्णपणे महिला असतील अशी उड्डाणे होणार असल्याचे या विमान कंपन्यांनी जाहीर केलयं. 

तिप्पट महिला भरती 

या सर्वामध्ये स्पाइस जेट सर्वात पुढे आहे.महिला पायलट्सची नियुक्तीचे अभियान सुरू करण्यात आलयं.

तसेच आपल्या एकुण पायलट्समध्ये महिला कॉकपिट क्रू ची संख्या तिप्पट करण्याचा निश्चय एयरलाईन्सने केलायं. 

एअर लाईन्सचा पुढाकार 

 सध्या एअरलाईन्समध्ये एकूण ८०० पायलट आहेत. ज्यामध्ये १४० महिला पायलट आहेत.

एअरलाइन्स सध्या बोइंग ७३७ आणि बॉम्पार्डियर क्यू ४०० साठी महिला पायलट्सची भरती करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन दिवस यासंदर्भात निवड प्रक्रिया होणार आहे. बुधवारपासून याला सुरूवात होतेय. 
 
रविवारी एयर इंडियाच्या कोलकाता-दीमापुर-कोलकाता मार्गावर झालेल्या उड्डाणातील चालक दलात सर्व महिला सदस्य होत्या. 

महिला राज 

 एयर इंडिया फ्लाइट एआय ७०९ (एअरबस ३१९) ची कमान कॅप्टन आकांक्षा आणि कॅप्टन सतोविसा बॅनर्जी यांनी संभाळली.

तर कॅबिन क्रू सदस्यांमध्ये डी भूटीया, एमजी मोहनन, टी घोष आणि यातिलि कथ यांचा समावेश होता.

एयर इंडियाच्या जनरल मॅनेजर (कार्मिक) नवनीत सिद्धूने उड्डाणाला सिटी एयरपोर्टमधून हिरवा कंदील दाखवला.