लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 18, 2017, 04:48 PM IST
लैंगिक अत्याचाराबाबत सनी लियॉन म्हणते..

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्येही कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबात जोरदार चर्चा झडत आहेत. या चर्चेदरम्यान, बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या मुद्द्यावर पुढे येत आपापली प्रतिक्रिया दिली आहे. यात माजी पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लियॉनचाही समावेश आहे.

काय म्हणाली सनी?

एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेल्या सनीने लैंगिक अत्याचाबाबत प्रतिक्रिया दिल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे की, सनी नेमकी काय बोलली? 'टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉम'ला सनीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सनीने लैंगिकत अत्याचाराबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक शोषणाबाबत आणि या शोषणाला बळी पडलेल्या पीडितांबद्दल सहनुभूती व्यक्त केली आहे. सनी म्हणते, 'कामाच्या ठिकाणी केवळ महिलांचेच लैंगिक शेषण होते असे नाही. तर, अनेकदा पुरूषांचेही लैंगिक शोषण होते. अनेक ठिकाणी ही सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, हे अत्याचार कोणीही खपवून घेऊ नयेत. आपल्यासोबत झालेल्या चुकीच्या प्रकाराबद्दल प्रत्येकाने दाद मागायला हवी. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत गोष्टी कधीच बदलणार नाहीत.'

सनीविषयी थोडक्यात...

सनीचा जन्म 1981मध्ये सर्निया ओंटारियो येथे एका पंजाबी कुटूंबात झाला. ती 11 वर्षांची असताना कुटूंबियांसोबत ती यूएसला स्थलांतरीत झाली. सनीचे वडील इंजिनियर होते. तर आई गृहिणी. सनीला एक भाऊ असून, त्याचे नाव संदीप सिंह वोहरा असे आहे. सध्या तो अमेरिकेत शेफचे काम करतो. सनीच्या   चाहत्यांसह जगभरातील अनेकांना तिच्या करीअरबद्धल माहिती आहे. पण, पॉर्न इंडस्ट्रीने प्रसिद्धी, पैसा आणि ग्लॅमर मिळवून दिले असले तरी, सनीला मात्र कधीच पॉर्नस्टार व्हायचे नव्हते.

सनीला पॉर्नस्टार बनायचं नव्हतं...

अनेक मंडळींना हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. पण, हे खरे आहे. सनी लियॉनला एक यशस्वी नर्स बनायचं होतं. विशेष म्हणजे पॉर्नस्टार होण्यापूर्वीही सनी नर्सींगचेच शिक्षण घेत होती. सनीने वयाच्या 19व्या वर्षातच स्वत:च्या मर्जीने अॅडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश केला. एडल्ट इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी सनी ही अत्यंत सामान्य मुलगी होती. मात्र, एडल्ट इंडस्ट्रीने तिचे सामान्यपण ग्लॅमरमध्ये बदलवलं. सनीने आपल्या करिअरची सुरूवात बेकरी शॉपपासून केली.