तिरुवअनंतपुरम : सर्पदंश काहीही न कळण्याच्या आता अगदी २ तासांच्या आत जीव घेणारं विष. भल्याभल्या वाट लावणारे काही विषारी साप आहेत. अगदी श्वसनसंस्थेवर परिणाम करणारं हे विष असतं असं म्हटलं जातं. पण या विषारी सर्पदंशाचा औषधी वनस्पतीने ईलाज करते ७५ वर्षीय महिला लक्ष्मीकुट्टी अम्मा. यावर विश्वास ठेवण्यासारखंच आहे.
कारण लक्ष्मीकुट्टी यांना सर्पदंशावर इलाज करून, शेकडो जणांचे जीव वाचवले आहेत. लक्ष्मीकुट्टी यांना त्यांच्या या कार्याविषयी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
लक्ष्मीकुट्टी या २८ वर्षांच्या असल्यापासून औषधी वनस्पतीने लोकांच्या सर्पदंशाचा इलाज करीत आहेत. मागील ४६ वर्षांपासून हे काम सुरू आहे. लक्ष्मीकुट्टी यांच्याकडे ५०० प्रकारच्या औषधी आहेत.
परिस्थितीनुसार मी शिकत गेली, मी जंगलापासून खूप काही शिकलीय, मी कुणी एकाला आपला गुरू म्हणू शकत नाही, असं लक्ष्मीकुट्टी सांगतात. १९५० मध्ये लक्ष्मीकुट्टी आपल्या भागात शिकलेल्या फार कमी व्यक्तींपैकी एक आहेत. बोटॅनिकल गार्डनमध्ये रिसर्चसाठी रोपं आणि औषधी पाला देत होती.
लक्ष्मीकुट्टी यांना १९९५मध्ये केरळ सरकारचा नट्टू वैद्य रत्न पुरस्कार देण्यात आला. लक्ष्मीकुट्टी यांना संस्कृत देखील येतं. त्या कवी देखील आहेत, नाटकं देखील लिहितात.
तिला स्थानिक लोक जंगलाची आजीबाई देखील म्हणतात, या आजीबाईच्या बटव्यातील औषधी सर्पदंशावर रामबाण उपाय आहेत. नैसर्गिक औषधींबद्दल लक्ष्मीकट्टू यांचं चर्चासत्र वैद्यकीय महाविद्याला देखील आयोजित केले जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात देखील लक्ष्मीकुट्टी यांच्याविषयी यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे.