व्हॅलेंटाईन डे स्पेशल : हे टॅटू गोंदवून करा प्रेम व्यक्त

या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2018, 08:55 PM IST

नवी दिल्ली :  व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी कपल्स तयारीला लागलेयत. प्रत्येतजण काहीतरी हटके गिफ्ट देण्याच्या विचारात आहे.

पण या प्रेमाच्या दिवशी टॅटू गोंदवून प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्डही वाढत आहे. टॅटू आर्टीस्ट विकास आणि मिकी मिलानी यांनी प्रेम व्यक्त करताना टॅटू गोंदवणाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत.

अंगठीचा आकार 

 लग्नात अंगठी अदला बदली करण्याआधी अंगठीच्या आकृतीचा टॅटू गोंदविला जाऊ शकतो. 

लग्नाची तारीख 

 एकमेकांच्या मनगटावर लग्नाच्या तारखेचा टॅटू गोंदविला जाऊ शकतो. रोमन संख्येत टॅटू गोंदविल्यास आणखी आकर्षक दिसतो. 

मनगटावर

 मनगटावर कुठेही मॅचिंग पंखाच्या आकृतीचा टॅटू गोंदवू शकता. 

अर्धा अर्धा टॅटू 

जोडपी आपल्या प्रेमाचा संदेश देणारा टॅटू गोंदवू शकतात. एकाने अर्धा मेसेज आणि उरलेला मेसेज दुसऱ्याने गोंदविता येईल. दोघे जेव्हा एकत्र येतील तेव्हा प्रेमाचा संपूर्ण संदेश दिसेल. हे काहीतरी हटके होऊ शकतं.

प्रेमाचा संदेश 

आपल्या खांद्यावर क्विन ऑफ हार्ट्स आणि किंग ऑफ हार्ट्स असा टॅटू गोंदवू शकता.

टाळं आणि चावी 

 टाळं आणि चावी, बाण आणि ह्रदय अशा आशयाचे टॅटू गोंदवू शकता.