हिरव्या रंगाचा Vaginal discharge होतोय? सावधान कारण...

मासिक पाळी येण्यापूर्वी होणाऱ्या डिस्चार्जमुळे अनेकदा महिला चिंतेत पडतात.

Updated: Feb 26, 2022, 12:57 PM IST
हिरव्या रंगाचा Vaginal discharge होतोय? सावधान कारण... title=

मुंबई : योनीमार्गातून होणारा स्राव अनेकदा महिलांच्या आरोग्याबाबत माहिती देतो. हा स्राव चिकट द्रव पदार्थ असतो जो गर्भाशयातील ग्रीवांमधील ग्रंथींनी तयार होतो. यामुळे योनीमार्ग साफ होण्यास मदत होते. मुळात योनीमार्गातून डिस्चार्ज होणं हे अगदी सामान्य आहे. मासिक पाळी येण्यापूर्वी होणाऱ्या डिस्चार्जमुळे अनेकदा महिला चिंतेत पडतात.

सामान्यतः होणाऱ्या डिस्चार्जचा रंग हा पांढरा असतो. मात्र अनेकदा महिलांना काहीसा हिरव्या रंगाचा डिस्चार्ज होतो. या डिस्चार्जला हलका गंधही येतो. मात्र हिरव्या रंगाचा स्राव जाणं हे सामान्य नसून यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

कोणत्या कारणाने हिरव्या रंगाचा डिस्चार्ज होतो?

ट्रायकोमोनिएसिस

ट्रायकोमोनिएसिस एक इन्फेक्शन आहे ज्यामध्ये योनीमार्गातून हिरव्या रंगाचा डिस्चार्ज होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ग्रीन डिस्चार्ज होत असेल तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

पेल्विक इंफ्लेमेटरी डिसिज

पीआईडी ​​हे योनी मार्गातील बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. यामध्ये प्रमुख दोन एसटीडी आहेत ज्यांना गोनोरिया आणि क्लामायडिया म्हटलं जातं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या दोन इन्फेक्शनमुळे योनीमार्गातून पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्राव होतो.

टॅम्पोनचा वापर

जर योनीमार्गात कोणती वस्तू जसं की टॅम्पॉनचा वापर केला जात असेल तर हिरव्या रंगाचा स्राव येण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, असं असल्यास टॅम्पॉनचा वापर करू नका. इन्फेक्शन असल्यास उपचार करून घ्या.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x