close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ : अवघ्या एका वर्षाच्या 'जलपरी'ला पोहताना पाहिलंत का?

ज्या वयात लहान मूल रांगणं आणि उभं राहणं शिकत असतात त्या वयात या चिमुरडीनं चक्क पाण्याशी मैत्री केलीय

Updated: May 16, 2019, 01:32 PM IST
व्हिडिओ : अवघ्या एका वर्षाच्या 'जलपरी'ला पोहताना पाहिलंत का?

मुंबई : 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' असं म्हणतात... पण या जलपरीचे पाय तर पाण्यात दिसत आहेत... एका चमत्कारापेक्षा हे काही कमी नाही. अवघ्या एका वर्षांची ही चिमुरडी पाण्यात चक्क पोहताना दिसतेय. सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

या व्हिडिओत एक चिमुरडी पोहताना दिसतेय. एवढचं नाही तर ही चिमुरडी पाण्यात बॅक-स्ट्रोक, फ्रंट क्रॉल आणि स्पिन करूनही आनंद घेतेय. 

ज्या वयात लहान मूल रांगणं आणि उभं राहणं शिकत असतात त्या वयात या चिमुरडीनं चक्क पाण्याशी मैत्री केलीय... आणि स्विमिंग पूलमध्ये ती बिनधास्त वावरते. 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ फ्लोरिडाचा आहे. फ्लोरिडामध्ये या चिमुरडीच्या पालकांनी अगदी लहान वयातच तिला पोहणं शिकवण्याची सुरूवात केलीय. तिच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या अवघ्या नवव्या महिन्यातच त्यांची चिमुरडी पाण्यात पोहणं शिकलीय त्यानंतर ती आता पट्टीची जलतरणपटू बनलीय.