पाकिस्तानमध्ये 'हाजारा एक्स्प्रेस'चा भीषण अपघात! ट्रेन रुळावरुन घसरली; 15 जणांनी गमावले प्राण

Pakistan Train Accident: पाकिस्तानात एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळांवरुन घसरल्याने 15 जण ठार झाले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 6, 2023, 04:01 PM IST
पाकिस्तानमध्ये 'हाजारा एक्स्प्रेस'चा भीषण अपघात! ट्रेन रुळावरुन घसरली; 15 जणांनी गमावले प्राण title=
15 killed and 50 injured after passenger train derails in Pakistan

Pakistan Train Accident: पाकिस्तानमध्ये रविवारी एक भीषण अपघात घडला आहे. शहजापूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्थानकाजवळ रावळपिंडी येथे जाणारी हाजारा एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. ट्रेनचे 10 डब्बे रूळांवरुन खाली घसरले आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तप, जवळपास 50 लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कारण ट्रेनमध्ये अनेक जण प्रवास करत होते.

दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या लोकांना नवाबशाह मोडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे रुळांवरुन घसरण्याचे अद्याप ठोस कारण समोर आले नाहीये. या प्रकरणी अधिकारी तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त डब्यांतून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. दुर्घटनाग्रस्त ठिकाणाच्या जवळपासच्या रुग्णालयात इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. 

अपघात घडला त्यावेळी ट्रेन कराचीहून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जात होते. अद्याप अपघाताविषयी संपूर्ण माहिती समोर आली नाहीये. दरम्यान दुर्घटनाग्रस्त हाजरा एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेले इंजिन आणि अलीकडेच मार्चमध्ये हवेलियाहून कराची जाणाऱ्या ट्रेनमध्ये जाणाऱ्या रेल्वेचे इंजिन सारखेच होते. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं या ट्रेनचाही अपघात झाला असता. तर, अलीकडेच कराचीहून सियालकोट येथे जाणाऱ्या अल्लामा इकबाल एक्स्प्रेसचे तीन डब्बे रुळांवरुन खाली घसरले होते. मात्र, या दुर्घटनेत कोणालाच गंभीर इजा झाली नव्हती. पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. मागील एक दशकात पाकिस्तानात अनेक रेल्वे दुर्घटना घडल्या आहेत.