ब्रिटनमध्ये निवडून आल्या २०० महिला

ब्रिटन निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या प्रीत कौर गिल यांच्यासह २०० महिला उमेदवार निवडणून आल्या आहेत. हे पहिल्यांदाच झालं आहे की, ब्रिटनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून आल्या आहेत. याआधी २०१५ मध्ये १९१ महिला उमेदवार निवडून आल्या होत्या.

Updated: Jun 10, 2017, 12:46 PM IST
ब्रिटनमध्ये निवडून आल्या २०० महिला title=

नवी दिल्ली : ब्रिटन निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या प्रीत कौर गिल यांच्यासह २०० महिला उमेदवार निवडणून आल्या आहेत. हे पहिल्यांदाच झालं आहे की, ब्रिटनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून आल्या आहेत. याआधी २०१५ मध्ये १९१ महिला उमेदवार निवडून आल्या होत्या.

मध्यावधी निवडणुकांमध्ये देखील काही महिला निवडून आल्या होत्या. कॉलिफिकेशन ऑफ व्युमन अॅक्ट १९१८ नंतर युकेमध्ये महिलांना निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला होता.