VIRAL VIDEO : ...म्हणून तब्बल ३२ जण पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालू लागले!

पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालणाऱ्या या घोळक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Updated: Oct 20, 2019, 05:48 PM IST
VIRAL VIDEO : ...म्हणून तब्बल ३२ जण पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालू लागले! title=

नवी दिल्ली : पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावरुन चालणारी माणसं पाहिलीत तर तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल ना... पण, असं दृश्य खरोखरच दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊन शहरात पाहायला मिळालं... आणि काहीकाळ बघेकऱ्यांची एकच भंबेरी उडाली. पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालणाऱ्या या घोळक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

स्वतःला पेटवून घेणारे हे एक दोघे जण नव्हेत नव्हते तर तब्बल ३२ जण होते. कुणालाही वाटेल आग लावून चालणारे हे आंदोलक असावेत. सामूहिक आत्मदहनाचा काहीतरी प्रकार असावा... पण असं काहीही नव्हतं... स्वतःला आग लावून या ३२ जणांनी विश्वविक्रम केला.

पेटलेल्या अवस्थेत एकाच वेळी ३२ व्यक्तींनी चालण्याचा हा विक्रम झालाय दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्ये... केपटाऊनमधील सिनेमात स्टंट करणाऱ्या केविन बिटर व्हॅरनॉन विल्यमल्स आणि ग्रँड पॉवेल या तिघांच्या नेतृत्वात हा स्टंट करण्यात आला. 

रस्त्यावर हे ३२ स्टंटमॅन उभे राहिले. त्यांनी अग्निरोधक सूट घातले होतेय. चेहऱ्यावरही अग्निरोधक मास्क घातले होते. आगीशी खेळ करायचा होता म्हटल्यावर सुरक्षेची सगळी खबरदारी घेण्यात आली होती. सहाय्यकांनी एकाच वेळी ३२ जणांना आग लावली. ज्वाळांनी वेढलेला घोळका रस्त्यावर चालू लागला...

पेटती माणसं चालतायत हे पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. लोकं श्वास रोखून पाहत होती. ३० सेकंदानंतर या स्टंटमॅनपैंकी पहिला माणूस जमिनीवर झोपला. त्याची आग तातडीनं विझवण्यात आली. प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार चालत होता. जो रस्त्यावर आडवा पडला त्याची आग विझवण्यात येत होती. 

शेवटी विक्रमाला गवसणी घातल्याचं स्पष्ट झाल्यावर सगळे स्टंटमॅन जमिनीवर झोपले. आग विझवण्यात आली. स्टंटमॅन किती धोका पत्करुन त्यांचं काम करत असतात, हे दाखवण्यासाठी हा विक्रम करण्यात आला. स्वतःला आग लावून घेण्यासाठी त्यांनी पुरेशी काळजी घेतली होती. त्यामुळं कुणालाही ईजा झाली नाही. विक्रमी कारनामा इंटरनेटवर जबरदस्त हिट झाला.