इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, भूकंपात ३४ जणांचा मृत्यू तर ५२ जण बेपत्ता

इंडोनेशियाला आज पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला

PTI | Updated: Oct 2, 2018, 11:27 PM IST
इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, भूकंपात ३४ जणांचा मृत्यू तर ५२ जण बेपत्ता  title=
Image Credit: Reuters

जकार्ता : इंडोनेशियाला आज पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला. भारतीय वेळेनुसार सकाळी सव्वा सहाच्या सुमारास रिश्टर स्केलवर ५.९ तीव्रतेच्या भूकंपानं इंडोनेशियातील संबा बेटावर हादरे बसले. या भूकंपात ३४ जणांचा मृत्यू झालाय. तर ५२ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय.

 गेल्याच आठवड्यात इंडोनेशियातील सुवीला बेटावर झालेल्या भूकंपात साडे आठशे लोकांचा बळी गेलाय. या जीवित हानीनंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांना फोन करून मदतीचं आश्वासन दिलंय.