ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद

Indian dog walker attacked in park : पोलिसांनी आधिच कारवाई केली असती तर अशी वेळ आली नसती, असं मृत कोहली यांच्या मुलाने म्हटलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Sep 4, 2024, 05:13 PM IST
ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद title=
British Indian dog walker attacked in park

London Crime News : मुळ पंजाबमधील एका 80 वर्षीय ब्रिटिश भारतीय व्यक्तीची लंडनमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर हत्येच्या संशयावरून पाच मुलांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. भीम सेन कोहली नावाच्या या मृत व्यक्तीवर लीसेस्टरमधील पार्कमध्ये हल्ला केला गेला. त्यामुळे आता ब्रॉनस्टोन टाऊन आणि संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाल्याचं रहायला मिळतंय. नेमकं काय झालं? मारेकरी नेमके कोण होते? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नेमकं काय झालं?

भीम सेन कोहली रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता लीसेस्टरजवळील ब्रॉनस्टोन टाऊनच्या फ्रँकलिन पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्या कुत्र्याला फिरवत असताना तरुणांच्या एका गटाने त्याच्यावर गंभीर हल्ला केला. मारेकरांच्या टोळीमध्ये अल्पवयीन मुलं होती. यामध्ये 14 वर्षांचा एक मुलगा आणि मुलगी, तसेच 12 वर्षांचा एक मुलगा आणि दोन मुली होत्या. खरं तर टेरेसवर मस्ती करण्यावरून वाद झाला होता. या पाच जणांच्या टोळीने वृद्ध मिस्टर कोहलीवर हल्ला चढवला अन् त्यांना चोप दिला.

कोहली यांच्याकडे तीन फ्लॅट होते. तर अल्पवयीन मुलं शेजारच्या फ्लॅटमध्ये पार्ट्या करत असायचे. पण या मुलांनी कोहली यांना त्रास देणं सुरू केलं. मुलं टेरेसवरून उड्या मारायचे त्यामुळे कोहली यांना त्रास सततचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. मुलांना याचाच राग आला अन् मुलांनी 80 वर्षांच्या कोहली यांना धडा शिकवायचं ठरवलं. कोहली यांना गार्डनमध्ये जाताना पाहून मुलांनी कोहली यांना घेरलं अन् मारहाण केली. त्यावेळी कोहली केवळ 30 सेकंदाच्या अंतरावर होते.

अल्पवयीन मुलांनी 80 वर्षांच्या कोहलींना मारहाण केल्यानंतर मुलांनी पळ काढला. पण हल्ल्यात जखमी झालेल्या कोहलीचा सोमवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोहली यांच्या जखमांच्या गंभीरतेमुळे त्याला नॉटिंगहॅममधील क्वीन्स मेडिकल सेंटर (QMC) येथे नेण्यात आले होते. कोहली यांच्या मुलीने दावा केला होता की, त्याला जमिनीवर ढकललं गेलं आणि लाथ मारण्यात आली. त्याच्या मानेवर लाथ मारली, मणक्यात लाथ मारली. त्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याला शस्त्रक्रियेसाठी QMC कडे पाठवण्यात आलं होतं.

दरम्यान, कोहली यांचा आरोप होता की, आरोपी मुलं नेहमी त्यांना त्रास देत होते. त्यामुळे कोहली यांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. मात्र, पोलिसांनी कोहली यांची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असं कोहली यांनी जवळच्या मित्रांना सांगितलं होतं. कोहली जेव्हा आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन जात होते, तेव्हा ही मुलं जमायची आणि त्यांना त्रास देत होती, असंही कोहली यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे.