हिंसक झडपमध्ये चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू तर ११ जखमी : ग्लोबल टाईम्स

भारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप, सीमेवर तणाव

Updated: Jun 16, 2020, 02:41 PM IST
हिंसक झडपमध्ये चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू तर ११ जखमी : ग्लोबल टाईम्स title=

नवी दिल्ली : लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात काही महिन्यांपासून तणवाचं वातावरण असताना हिंसक झडप झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये एक भारतीय लष्करी अधिकारी आणि २ जवान शहीद झाले आहेत. गलवान खोऱ्यात ही झडप झाली. यामध्ये चीनचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.

गलवान खोऱ्यात १५ जूनपासून चर्चा सुरु होती. ब्रिगेडियर कमांडर, कमांडर ऑफिसर लेवलच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरु होती. गलवान खोऱ्यातील सैनिकांना माघारी पाठवण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती करण्यासाठी चर्चा झाली. पण आता या झडपनंतर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.

भारत-चीनी सैन्यांमध्ये झालेल्या या हिंसक झडपमध्ये ३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. पण भारताकडून देखील याला चोख उत्तर देण्यात आलं. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे रिपोर्टर वांग वेनवेन यांनी म्हटलं की, LAC वर चीनत्या पीपुल्स लिबरेशन आर्मीचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.

भारतीय लष्कराने याबाबत अधिकृत माहिती देताना म्हटलं की, 'गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री डि-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीन सैनिकांमध्ये झडप झाली. या दरम्यान २ भारतीय जवान आणि एक अधिकारी शहीद झाले आहेत.'