इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीत 5 हजार लोकं बेपत्ता

लोकं अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत

Updated: Oct 7, 2018, 04:40 PM IST
इंडोनेशियातील भूकंप आणि त्सुनामीत 5 हजार लोकं बेपत्ता

जकार्ता : इंडोनेशियामध्य़े आलेल्या भूकंप आणि त्सूनामीमध्ये पालू शहरातील कमीत कमी 5000 हजार लोकं बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी म्हटलं की, इंडोनेशियातील आपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार हा आकडा शहरातील स्थानिकांच्या गणनेवरुन देण्यात आला आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेत लोकं

रविवारी देण्यात आलेल्या माहितीत असं सांगण्यात आलं की, ''बालारोआ आणि पेतोबोच्या प्रमुखांनी दिलेल्या रिपोर्टनुसार कमीत कमी 5 हजार लोकं बेपत्ता झालेले आहेत. पण खरा आकडा अजून समोर आलेला नाही. कारण अजूनही लोकं ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत.