नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यात प्रमुख भूमिका असलेल्या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलचे प्रमुख मेंग हाँगवेई गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता आहेत. इंटरपोलच्या फ्रान्समधील लिऑनमधील मुख्यालयातून मेंग हे चीनला जायला निघाले होते. मात्र त्यानंतर ते कुठे गेले याचा थांगपत्ता लागला नाही.
मेंग यांचे अपहरण झाले की बेपत्ता याबाबत गूढ निर्माण झालंय.
फ्रान्स पोलिसांनी याबाबत तपास सुरु केलाय.
१९२ देशांच्या कायदे अंमलबजावणी संस्थांशी संबंधित इंटरपोलच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले मेंग हे पहिलेच चिनी नेते आहेत.
२०२० पर्यंत मेंग चीनमधील इंटरपोलच्या प्रमुखपदी कार्यरत राहणार आहेत.