विस्कोंसिन : मनुष्यांच्या इतिहासाचं रहस्य शोधण्यासाठी पुरातत्व विभाग खोदकाम करत होतं आणि त्यांच्या हाती एक अशी वस्तू लागली ज्यामुळे इतिहास उलघडण्यास मदत होणार आहे.
खोदकाम करत असतांना भेटलेल्या वस्तू आणि अवशेष इतिहासातील काही गोष्टी समजण्यासाठी मदत करणार आहेत. यूनाइटेड स्टेट्सच्या विस्कोंसिनमध्ये झालेल्या या खोदकामात एक अशी वस्तू मिळाली ज्याला पाहून सर्वच हैराण झाले.
खोदकामात एक असं भांड मिळालं जे जवळपास 800 वर्ष जुनं आहे. पण ते सोनं किंवा चांदीने भरलेलं नाही. तर विचित्र बियांनी भरलेलं आहे. त्यापैकी काही खराब झाले आहेत तर काही अजूनही चांगले आहेत. ते कोणत्या फळाच्या बिया आहेत ते शोधण्यासाठी त्यांची जमिनीत लागवड करण्यात आली. त्यानंतर काही दिवसात त्याला एक फूल लागलं आणि त्यानंतर त्याला एक भोपळ्या सारखं फळ लागलं.
800 वर्षाआधी मनुष्याच्या दूरदृष्टीमुळे आज आपण अनेक फळांचा आस्वाद घेत आहोत. पण असे अनेक फळ आहेत जे या धरतीवरुन नष्ट झाले आहेत. पण भेटलेल्या या जुन्या बियांमुळे आता इतिहासातील ते फळ पुन्हा एकदा सर्वांना खायला मिळणार आहे.