40,000 कोटींच्या संपत्तीचा त्याग करुन बनला बौद्ध भिक्षु; 18 वर्षाच्या मुलाचा मोठा निर्णय

सिरीपन्यो यांचे वडिल जगातील श्रीमंत उद्योगपती आहेत. तर, त्यांची आई देखील राजघराण्यातील आहे. त्यांच्या आई या थाई राजघराण्याचा वंशज आहेत. सर्व सुखांचा त्याग करुन ते बौद्ध भिक्षु बनले आहेत. 

Updated: Jul 10, 2023, 07:54 PM IST
40,000 कोटींच्या संपत्तीचा त्याग करुन बनला बौद्ध भिक्षु; 18 वर्षाच्या मुलाचा मोठा निर्णय  title=

The Billionaire Became a Monk : भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. अनेक जण भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेल्या मार्गावर चालत आहेत. राजपुत्र असलेले भगवान गौतम बुद्ध सर्व सुखांचा त्याग करत पत्नी, मुलगा आणि संपत्ती सोडून ते ज्ञानाच्या शोधासाठी बाहेर पडले. गौतम बुद्ध यांच्या या कृतीचे प्रत्यक्षात अनुकरण त्यांच्या एका अनुयायाने केले आहे. वेन अजहन सिरीपान्यो असे या अनुयायाचे नाव आहे. सिरीपान्यो यांनी 40,000 कोटींच्या संपत्तीचा त्याग केला. वयाच्या 18 व्या वर्षी  सिरीपान्यो बौद्ध भिक्षु बनले. 

कोण आहेत वेन अजन सिरीपन्यो? 

श्रीलंकेतील तामिळ-मूळ दूरसंचार टायकून आनंदा कृष्णन हे  सिरीपन्यो यांचे वडिल आहेत.  टेलिकॉम, मीडिया, तेल आणि वायू, रिअल इस्टेट आणि उपग्रह असं आनंदा कृष्णन यांच्या उद्याचं जाळं आहे. ऐवढ्या मोठे साम्राज्याचे  सिरीपन्यो हे एकुलते एक वारसदार आहेत. कृष्णन यांची किमान 9 कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. ते मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. सिरीपन्यो यांनी मनात आणलं असतं तर त्यांनी या उद्योगांना आणखी उंचीवर नेऊन ते जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले असते. 

सिरीपन्यो यांच्या वडिलांच्या कंपनीचे थेट एअरसेलसोबत कनेक्शन

सिरीपन्यो यांचे वडील आनंदा कृष्णन यांची एकूण संपत्ती सुमारे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40 हजार कोटी इतकी आहे. AK म्हणू ओळखले जाणारे कधीकाळी दुरसंचार क्षेत्रातील आघाडीचे भारतीय फोन कंपनी एअरसेलचे ते मालक होते. इतकच नाही तर दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नेतृत्वाची IPL संघ चेन्नई सुपर किंग्सला देखील प्रायोजित केले होते.

सिरीपन्यो या घेतला सन्यास

सिरीपन्यो यांचे वडिल आनंद कृष्णन स्वतः बौद्ध धर्मीय आहेत. दानशूर म्हणूनही ते ओळखले जातात. शिक्षणापासून मानवतावादी प्रयत्नांपर्यंत अनेक कारणांसाठी देणगी दिली आहे. आनंद कृष्णन यांचा मुलगा सिरीपन्यो यांनी सर्व संपत्ती, सुख आणि ऐश्वर्याचा त्याग करत सन्यास घेतला आहे. वयाच्या 18 व्या वर्षी सिरीपन्यो बौद्ध भिक्षु बनले. याला आता दोन दशकांचा कालावधी उलटला आहे. सिरीपान्योने तरुण वयात भिक्षु होण्याचा निर्णय का घेतला याबाबत  फारशी सार्वजनिक माहिती नसली तरी. धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. ब्रिटनमध्ये  2 बहिणींसह लहानाचे मोठे झालेले सिरीपन्यो 8 भाषा बोलू शकतात.