काबूल: Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा घेतल्यानंतर, (Taliban in Afghanistan) जिथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक भीतीच्या छायेखाली आहेत. (Situation in Afghanistan) अनेक लोक घाबरुन देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी करत आहेत. त्याठिकाणी चेंगराचेंगरी झाली आहे. मात्र, येथील ब्रिटिश राजदूताने ( British ambassador) काबूलमध्येच (Kabul) राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या जीवाची काळजी न करता, राजदूत सर लॉरी ब्रिस्टो (Sir Laurie Bristow) यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत 4000 ब्रिटिश आणि अफगाणिस्तानातील जवानांना सुरक्षित बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत ते अफगाणिस्तान सोडणार नाहीत आणि कुठेही जाणार नाहीत. त्याच्या धाडसाबद्दल राजदूतचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्रिटनच्या लोकांनी त्याला नायक म्हटले.
'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सर लॉरी ब्रिस्टो आणि समर्पित मुत्सद्यांच्या टीमने काबूल विमानतळावर आपत्कालीन ऑपरेशन सुरू केले आहे.
जेणेकरून त्यांच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढता येईल. राजदूताने ब्रिटिश सरकारला सांगितले आहे की, जोपर्यंत ब्रिटिश आणि त्यांचे अफगाण कर्मचारी येथून निघणार नाहीत तोपर्यंत ते देश सोडणार नाहीत.
त्याचवेळी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, काबूलमध्ये अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणखी 200 सैनिक अफगाणिस्तानात पाठवले जात आहेत. याआधी शनिवारी, 16 एअर असॉल्ट ब्रिगेडचे सुमारे 600 पॅराट्रूपर्स अफगाणिस्तानात पोहोचले होते आणि अफगाणिस्तानातून सुमारे 200 लोकांना बाहेर काढण्यात मदत केली होती. या बचाव कार्याचे नेतृत्व राजदूत सर लॉरी ब्रिस्टो करत आहेत. असे मानले जाते की ही मोहीम या महिन्याच्या अखेरीपर्यंत चालू शकते.
लॉरी ब्रिस्टो म्हणतात की यावेळी त्यांचे संपूर्ण लक्ष अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर आहे आणि हे काम पूर्ण होईपर्यंत ते अफगाणिस्तान सोडणार नाही. राजदूताने आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धग्रस्त देशात राहिल्याबद्दल कौतुक केले जात आहे. लोक त्याला हिरो बोलले जात आहे. तालिबानच्या ताब्यात आल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानमधील आपले दूतावास बंद केले आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी (Ashraf Ghani) हे पहिले देश सोडून गेले.