पुढच्या 48 तासांत जगावर आणखी एका युद्धाचं सावट; 'या' देशांमध्ये पडलीये ठिणगी

(Russia Ukraine war) रशिया- युक्रेन युद्ध निकाली निघत नाही, तोच आणखी एका युद्धाचा वणवा भडकण्याची भीती.... जग नेमकं कोणत्या वाटेवर ? 

Updated: Nov 2, 2022, 09:46 AM IST
पुढच्या 48 तासांत जगावर आणखी एका युद्धाचं सावट; 'या' देशांमध्ये पडलीये ठिणगी  title=
after russia ukraine war Iran warn to attack on Saudi Arabia

Iran warn to attack on Saudi Arabia: गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असणारं (Russia ukraine war) युद्ध काही केल्या निकाली निघताना दिसत नाहीये. अनेक राष्ट्रांनी मध्यस्ती घालण्याचा प्रयत्न करुनही या युद्धाला असंख्य फाटे फुटताना दिसत आहेत. एकिकडे हे युद्ध अण्वस्त्र हल्ल्यांच्या वळणावर असतानाच जगावर आणि एका युद्धाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. सौदी अरेबिया यावेळी संकटात आहे, कारण त्यांच्यावर इराणकडून हल्ला केला जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. 

सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या (America officials) अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहितीवर शिक्कामोर्तब करत आखाती राष्ट्रांमध्ये असणाऱ्या American Armed Forces ना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढचे 48 तास अतिशय संवेदनशील असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. 

अधिक वाचा : अधिक वाचा : Russia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष

Iran overtakes Saudi Arabia to become India's second largest oil supplier |  India News | Zee News

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पुढच्या 48 तासांच इराणकडून (iran) हल्ला केला जाऊ शकतो. एकंदर परिस्थिती पाहता सध्या आखाती राष्ट्रांमध्ये सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. आवश्यक ठिकाणांवर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. 

सौदी अरेबियावर इराणकडून निदर्शनं भडकवण्याचा आरोप 

सध्याच्या घडीला इराणमध्ये हिजाब वाद पेटला आहे. आतापर्यंत या वादाला धरून सुरु असणाऱ्या निदर्शनांमध्ये 200 जणांचा मृत्यू ओढावला तर, 1000 हून अधिकजणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इराणकडून सौदी अरेबिया राष्ट्रावर अमेरिका आणि इस्रायलसोबत मिळून सौदीमध्येही ही निदर्शनं भडकवण्याचा आरोप केला आहे. तेव्हा आता या दोन्ही राष्ट्रांमध्ये पडलेली ही वादाची ठिणगी आणखी धुमसून तिचा वणवा होणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे. 

... तर इराण वर मोठी कारवाई 

इराणनं रशिया युक्रेन युद्धात, रशियाची साथ देत त्यांना शेकडो ड्रोन आणि इतर तांत्रिक गोष्टींद्वारे मदतीचा हात दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इराणच्या या निर्णयाची कटू शब्दांत निंदा करत आपण भविष्यातील संकट पाहता चिंतीत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. आपलं सैन्य असणाऱ्या क्षेत्रांमध्ये संरक्षणाच्या बाबतीत कुठेच माघार घेतली जाणा नाही, असं म्हणत इराणनं हल्ल्याचं पाऊल उचलल्यास त्यांच्यावरही मोठी कारवाई होऊ शकते असा इशारा बायडन यांनी दिला.