Trending News : काही लोकांसाठी पैसे कमावणं हे कठिण असतं. कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले तरी काही लोकांच्या हातात पुरेसा पैसा पडत नाही. पण काही लोकांसाठी पैसे कमावणं अतिशय सोप काम असतं. नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. जगात असे काही व्यावसायिक आहेत जे सेकंदाला करोड-अरबो रुपयांची कमाई करतात. पण काही लोकांसाठी हजार रुपये कमवाण्यासाठी महिनाभर मेहनत करावी लागते.
पण तुमच्याकडे काहीतरी वेगळं करण्याची हिम्मत असेल आणि त्यासाठी हटके कल्पना असेल तर तुम्ही लहान व्यवसायातून श्रीमंत होऊ शकता. सध्या अशीच एक महिला आपल्या हटके व्यवसयामुळे ( Weird Jobs) चर्चेत आहेत. या महिलेने सुरु केलेल्या अजब-गजब व्यवसाची जगभरात चर्चा आहे. ही महिला तासाला 7400 रुपयांची कमाई करते. म्हणजे तुन्हाला तिच्या महिन्याभराच्या कमाईचा अंदाज आलाच असेल.
महिलचा हटके व्यवसाय
या महिलेचं नाव 'अनोक रोज' असं आहे. ती इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये रहाते. आपण प्रत्येकाने 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा चित्रपट पाहिलाच असेल. या चित्रपटात संजय दत्त त्रासलेल्या लोकांना जादू की झप्पी देतो आणि त्यांचा तणाव दूर करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे की झप्पीचा कधी व्यवसाय केला जाऊ शकेल. अनिको रोज ही लोकांना 'प्यार की झप्पी' देत लाखो रुपयांची कमाई करत आहे.
एका तासाचे 70 पॉण्ड
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार अनिको जे करते त्याला कडलिंग (Professional Cuddler) असं म्हटलं जातं. 42 वर्षांची अनिको गेल्या तीन वर्षांपासून हे काम करते. कडलिंग अर्थात 'प्यार की झप्पी'मुळे मनुष्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो, आणि तो तणावमुक्त होतो असा दावा अनिकोने केलाय. तणावात असलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण स्पर्श केला की त्याचं मानसिक स्वास्थ ठिक होतं, असा दावाही अनिकोने केलाय. विशेष म्हणजे अनिकोकडे प्यार की झप्पी घेण्यासाठी लोकांची रांग लागते. प्रोफेशल कडलर असल्याने अनिको एका तासाचे 70 पाँड्स म्हणजे भारतीय रुपयात 7400 फी आकारते.
लहान-वृद्ध थेरपीसाठी येतात
अनिकोकडे 20 ते 65 वर्षांपर्यंत लोकं उचारासाठी येतात. अनिको हिचं थेरपी सेशन एक तासाचं असतं. पण काही जणं सेशन वाढवून घेतात. यासाठी वेगवळे रुपये चार्ज केले जातात. यातून अनिको लाखो-करोडो रुपयांच कमाई करते.
QAT
(17.4 ov) 101
|
VS |
SDA
100/7(20 ov)
|
Qatar beat Saudi Arabia by 1 run | ||
Full Scorecard → |
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.