कंपनीची गजब मागणी '१०० झुरळं द्या आणि पैसे घेऊन जा', कारण ऐकून लोकांना धक्का

घरात आढळणारे प्राणी आणि कीटकांपैकी झुरळ हा सर्वात घृणास्पद कीटक मानला जातो. जो लोकांच्या सर्वात जास्त किचनमध्ये रहातो.

Updated: Jun 15, 2022, 06:01 PM IST
कंपनीची गजब मागणी '१०० झुरळं द्या आणि पैसे घेऊन जा',  कारण ऐकून लोकांना धक्का title=

मुंबई : घरात आढळणारे प्राणी आणि कीटकांपैकी झुरळ हा सर्वात घृणास्पद कीटक मानला जातो. जो लोकांच्या सर्वात जास्त किचनमध्ये रहातो. लोकांना तो आपल्या घरी कधीही नको असतो, त्यामुळे लोक त्याला घालवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. त्यासाठी औषध किंवा पेस्ट कंट्रोल लोक करतात. परंतु तुम्हाला याबद्दल एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल. कारण अमेरिकेतील एक अशी कंपनी आहे, जी शेकडो झुरळांच्या बदल्यात 1.5 लाख रुपये लोकांना देत आहे. तुम्हाला ही हे ऐकून धक्का बसला असेल ना? ही ऑफर ऐकून तेथील लोकांना देखील धक्का बसला आहे आणि कंपनी असं का करतेय? याच विचारात लोक आहेत.

नॉर्थ कॅरोलिना स्थित पेस्ट कंट्रोल कंपनी आपल्या नवीन कीड नियंत्रण औषधावर संशोधन करत आहे. अशा स्थितीत, त्याला एकाच वेळी अनेक झुरळांची गरज असते, ज्यावर ते संशोधन करु पाहात आहेत. आता कंपनी देशभरात अशा कुटुंबांचा शोध घेत आहे, ज्यांच्या घरात किमान 100 झुरळे असतील. जर असे घर कुठेतरी सापडले, तर ते या घरात राहणाऱ्या कुटुंबाला $2000 म्हणजेच भारतीय चलनात 1.5 लाख रुपयांहून अधिक देणार आहेत.

कंपनी या झुरळाचे काय करणार?

ही कंपनी कीटक दूर करण्यासाठी उपाय देत असल्याने, अशा परिस्थितीत, ते या झुरळांची चाचणी घेत आहेत. त्यामुळे ते सध्या अशा 5 ते 7 कुटुंबांचा शोध घेत आहे, जिथे झुरळांचा वावर आहे. या कीटकांवर ते त्यांचे विशेष कीटक नियंत्रण तंत्र वापरतील.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या अभ्यासातून हे लक्षात येईल की, या झुरळांवर नवीन उपचारपद्धती किती प्रभावी आहे.

शिवाय कंपनीच्या संशोधनासाठी जे कुटुंब घर देईल, कंपनी त्यांच्या घरात 100 अमेरिकन झुरळे सोडेल आणि त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी देखील देईल.

होय, या ऑफरद्वारे, झुरळे सोडल्याच्या बदल्यात कुटुंबाला पैसे मिळतील, तसेच हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जर झुरळे घरी राहिली, तर कंपनी झुरळांच्या पारंपरिक उपचारांद्वारे स्वखर्चाने ते नष्ट करेल.

या संशोधनात सहभागी असलेले कुटुंब हे महाद्वीपीय युनायटेड स्टेट्समधील असणे आवश्यक आहे आणि त्यांनी कंपनीला लेखी परवानगी देणे आवश्यक आहे.