स्वत:च बनवलेल्या विमानातून गेला भुर्रर्रssss....; स्वप्नांना खरेखुरे पंख देणाऱ्या अवलियाला पाहून सगळेच हैराण

माणसानं महत्त्वाकांक्षी असावं तरी किती... 

Updated: Jul 28, 2022, 11:49 AM IST
स्वत:च बनवलेल्या विमानातून गेला भुर्रर्रssss....; स्वप्नांना खरेखुरे पंख देणाऱ्या अवलियाला पाहून सगळेच हैराण title=
amazing Kerala man travels around Europe on plane built him ding Covid lockdown

मुंबई : कोरोनानं नाही म्हटलं तरीही बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अनेकांना त्यांची स्वप्न जगण्याची संधीही याच काळात मिळाली. काहींनी दरम्यानच्या काळात आपल्या कलागुणांना वाव दिला तर काहींनी किमयाच केली. (amazing Kerala man travels around Europe on plane built him ding Covid lockdown)

केरळच्या अशाच एका व्यक्तीनं सध्या संपूर्ण जगाला थक्क केलं आहे.  Ashok Alisheril Thamarakshan असं त्या व्यक्तीचं नाव. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अशोकनं चक्क एक विमान तयार केलं. युरोप आणि त्याभोवतीच्या परिसरात फिरण्यासाठी त्यानं विमान तयार करण्याचा विडा उचलला होता. 

युकेमधील Billericay येथे सध्या वास्तव्यास असणाऱ्या अशोकनं 1500 तासांमध्ये 1,40,000 euro इतका खर्च करत हे विमान बनवलं. सध्या तो युरोप आणि सभोवतालच्या परिसरात आपल्या कुटुंबासोबत फिरत असून, सर्वांचीच मनं जिंकत आहे. 

अशोक एक प्रशिक्षित वैमानिक आहे. त्यानं दोन वर्षांच्या मेहनतीनंतर घराच्याच गार्डनमध्ये हे विमान तयार केलं. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच अशोक आणि त्याची पत्नी अभिलाषा या दोघांनीही पैसे साठवण्यास सुरुवात केली होती. अडीअडचणीच्या वेळी हाताशी पैसे असावेत हाच त्यामागचा एकमेव हेतू होता. 

साठवलेल्या या पैशांचा त्यांनी असा वापर केला आणि संपूर्ण जगालाच आश्चर्याचा धक्का दिला. 'घराबाहेर विमान असणं म्हणजे जणू एत नवं खेळणं असण्याजोगं आहे, फक्त त्याबाबत कुतूहल जास्त आहे', अशी प्रतिक्रिया अशोकनं माध्यमांशी संवाद साधताना दिली. 

अशोकनं केलेली ही किमया पाहता त्यानं खऱ्या अर्थानं स्वप्नांनाच उडण्यासाठी पंख दिले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुम्हाला काय वाटतं?