वॉशिंग्टन : Kabul Blast :काबूल स्फोटांनंतर अमेरिकेने (America) इशारा दिल्याप्रमाणे कारवाईला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) ISIS अड्ड्यांवर हवाई हल्ला चढवला आहे. अमेरिकन ड्रोन्सनी ISIS अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच अमेरिकन नागरिकांना तातडीने अफगाणिस्तान (Afghanistan Updates) सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (America airstrike targets and kills IS member in retaliation for Kabul airport attack)
काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने कारवाई सुरु केली आहे. अमेरिकन ड्रोन्सनी ISISच्या अड्ड्यांवर जोरदार मारा केला. काबूल विमानतळाजवळ झालेल्या स्फोटानंतर ( Kabul Blast) अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक इशारा दिला होता. आत्मघातकी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट (Kabul Airport Blast) घडवला. या हल्ल्यानंतर अमेरिकेत संतप्त झाली होती. हल्लेखोर जिवंत राहणार नाहीत, असे अमेरिकेने इशारा देताना म्हटले होते. अमेरिका ISISच्या गुन्हेगारांना शोधून त्यांना शिक्षा करेल. दोषींचा तातडीने शोध घेऊन बदला घेऊ, असे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेच कारवाईचे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, काबूल एअरपोर्टवरही तालिबानचा शिरकाव केला आहे. मिलिट्री एरियात तालिबानी बदरी फोर्स शिरली आहे. एअरपोर्टच्या तीन महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबानने ताबा घेतला आहे. मात्र, अमेरिकेने तालिबानचा दावा फेटाळला आहे.
काबूल विमानतळावरही आता तालिबानने कब्जा केल्याची माहिती आहे. तालिबानच्या 313 बदरी फौजा विमानतळाच्या मिलिट्री एरियात शिरल्याची माहिती समोर येतेय. तालिबानचा प्रवक्ता बिलाल करिमीच्या दाव्यानुसार विमानतळाच्या तीन महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबानने कब्जा केला आहे. आता अगदी थोडा भाग अमेरिकेच्या ताब्यात उरला आहे. मात्र तालिबानचा हा दावा अमेरिकेने फेटाळला आहे.