Jobs Layoff : संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचं (World recession) संकट आलेलं असतानाच आता नोकरीच्या (Job opportunities) नव्या संधीही नसल्यामुळं अनेकांवर घरात बसण्याची वेळ आली आहे. त्यातही गेल्या काही वर्षांपासून परदेशात आणि विशेष म्हणजे अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेकांपुढे एच मोठं संकट उभं राहिलं आहे. हे संकट आहे, नव्या नोकरीच्या शोधाचं आणि अमेरिकेतील नागरिकत्वाचा मार्ग कायमचा बंद होण्याचं. येत्या 60 दिवसांमध्ये नवी नोकरी शोधा अथवा मायदेशी परत जा, अशा आशयाचा इशाराच (jobs in america) अमेरिकेत नोकरी अनेक भारतीय इंजिनिअर्सना देण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षीची आकडेवारी पाहता अमेरिकेमध्ये आयटी (IT Jobs) क्षेत्रातून 1 लाख 46 हजार जणांच्या नोकऱ्या गेल्या. यातही 50 हजारांहून अधिक नोकरदारांना नोव्हेंबर महिन्यात घरचा रस्ता दाखवण्यात आला. यात अमेकन नागरिकांची संख्या कमी असून, परदेशी आणि त्यातही भारतीयांचा आकडा मोठा आहे. साधारण 10 वर्षांहून अधिक काळापासून अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या आणि येत्या काळात तेथील नागरिकत्व मिळण्याची शक्यता असणाऱ्यांना आता नोकरी नसल्यामुळे मायदेशी परतण्यावाचून दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही.
उरले फक्त 60 तास
अमेरिकेमध्ये किमान सध्याच्या घडीला नव्यानं नोकरभरती केली जात नसल्यामुळं नोकरी गमावलेल्यांपुढे असंख्य अडचणी आहेत. या ठिकाणी साधारण 5 लाखांहून अधिकांकडे एच 1बी व्हिसा आहे. यात भारतीय आणि त्यामागोमाग चीनमधील नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. अशा व्हिसा धारकांसाठी आता नव्यानं नोकरी शोधण्यासाठी फक्त 60 तासांचा अवधी देण्यात आला आहे. अन्यथा त्यांच्या नागरिकत्वाच्या वाटा बंद होऊ शकतात.
कोरोनानंतर (Corona Crisis) IT कंपन्यांना जाहिरातीतून मिळणारं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलं आहे. जाहिरातदारांकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर होणाऱ्या खर्चातील कपात, जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका आयटी सेक्टरला बसत आहे. नव्या योजना राबवण्यासाठी आर्थिक पाठबळही नाही ज्यामुळं अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. येत्या काळात ही परिस्थिती आणखी वाईट वळणावर येणार असून आयटी कंपन्यांसाठी आणखी वाईट दिवस येऊ शकतात अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.