'या' देशात 270 रुपये किलो कांदा

कांद्याच्या दरात 9 टक्क्यांनी वाढ 

Updated: Nov 18, 2019, 09:08 AM IST
'या' देशात 270 रुपये किलो कांदा

मुंबई : भारतातील कांद्या (Onion)उंची गाठल्यानंतर आता याचा परिणाम इतर राज्यांवर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) कांदा 100 रुपये किलो झाला असून महिलांच किचन बजेट बिघडलं आहे. असं असताना बांग्लादेशमध्ये (Bangladesh) देखील कांद्याची किंमत (Price)9 टक्क्याने वाढली आहे. बांग्लादेशला कांदा महागड्या दरात आयात करावा लागत आहे. 

बांग्लादेशात कांद्याने आकाशाची उंची गाठली आहे. कधी 30 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 270 रुपये किलोने विकला जात आहे. बांग्लादेश सरकारला कांदा विमान मार्गाने आयात करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. 

बांग्लादेशमध्ये वाढत्या कांद्याच्या दराला भारत देखील जबाबदार आहे. भारतात कांद्याचे दर वाढल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कांदा निर्यात करणं बंद केलं आहे. अवकाळी पाऊ, महापूरामुळे कांद्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. ज्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे भारतातही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून याच्या तुलनेत बांग्लादेशमध्ये दर वाढले आहेत. 

विमानाने कांदा आयात केला जात आहे. यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. बांग्लादेशातील नागरिकांच्या किचनमधून कांदा हद्दपार झाला आहे. सामान्यांकडून याला विरोध दर्शवला जात आहे. म्यांमार, तुर्की, चीन आणि मिस्त्रमधून कांदा आयात केला जात आहे. 

बांग्लादेशात सरकारी संस्थान ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांग्लादेशने 45 रुपये प्रति किलोने कांदा विकायला सुरूवात केली आहे. मात्र सब्सिडीतून कांदा खरेदीसाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभं राहावं लागत आहे. वाढलेल्या दरामुळे हॉटेल मालकांनी आणि स्नॅक्स दुकानदारांनी कांद्याचा कमी वापर केला आहे.