Loyalty Check : नातं कोणतंही असो त्यात जर विश्वास नसेल तर, ते तुटायला फार वेळ लागत नाही. नात्यात चुकूनही संशय आला तर ते नातं संपायला फार वेळ लागत नाही. विश्वासाच्या आधारावर कोणत्याही परिस्थितीत कोणताही नातं टिकूच शकतं. ( relations and trust ) . नात्यामध्ये एकदा फूट पडली की नातं चुकीच्या वळणावर जायला सुरुवात होते. अशात अनेक नाती संपलेली आपण पहिली आहेत. असंच काहीसं घडलं एका जोडप्याच्या बाबतीत.
एक जोडपं होतं. बायको लग्नानंतर घरीच असायची. नवरा दिवसा ऑफिसला जायचा,( trust between husband and wife). जेव्हा संध्याकाळी नवरा कामावरून घरी यायचा तेव्हा मात्र घरी त्याला जे दिसायचं. ते पाहून त्याचा फार हिरमोड व्हायचा. हळू हळू तर या निराशेची जागा संशयाने घेतली. आता मात्र नवऱ्याच्या संशयात वाढ झाली आणि त्याने असं काही पाऊल उचललं की, ज्याची बायकोने कधी कल्पनासुद्धा केली नसणार. आपण बाहेर गेल्यावर बायको घरी नेमकी करते काय ज्यामुळे ती एवढी थकते याचा छडा लागलाच पाहिजे म्हणून त्याने एक निर्णय घेतला.
नवऱ्याचा आपल्या बायकोवरील संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला. घरी आल्यावर आपली बायको आपल्याला वेळ का देत नाही? आपल्या जवळ का येत नाही? याची रुखरुख त्याच्या मनात होती. शेवटी त्याने बायको नेमकं घरी करते काय, कुणासोबत वेळ घालवते, हे तपासण्यासाठी बायकोच्या अपरोक्ष त्याने घरात बसवले CCTV. या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासल्यानंतर नवऱ्याला मोठा धक्का बसला. कारण बायकोचं ते सत्य आता नवऱ्यासमोर आलं होतं. नवऱ्याला बायकोचं सत्य समजल्यावर त्याने थेट हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
नवऱ्याने बेडरूममध्ये जे CCTV लावले होते त्यात रात्रभर तिला तिची लहान मुलं झोपू देत नसल्याचं पाहायला मिळालं. रात्रभर झोप व्हायची नाहीच, याशिवाय सकाळी बायकोला लवकर देखील उठावं लागत होतं. सकाळी उठून मुलांच्या आंघोळी, नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टी तिलाच कराव्या लागत. यामध्ये ती पूर्णपणे थकून जात असल्याचं नवऱ्याला पाहायला मिळालं. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये तिला स्वतःलाही वेळ देता येत नव्हता.
आपली बायको आपल्या मुलांमध्ये आणि संसारात किती बुडली आहे हे नवऱ्याला समजलं. संसार करताना बायको जरी घरी असली तरी तिला किती कष्ट करावे लागतात हे देखील नवऱ्याला समजलं. अखेर नवऱ्याला त्याची चुक उमगली.